Ravi Bhawan Naag Bhawan : दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च, तरीही मंत्र्यांच्या घरांना वाळवी

Lakhs of rupees spent on repairs, yet ministers’ houses get damaged : रविभवन व नागभवनातील सरकारी निवासस्थानांना धोका

Nagpur रविभवन या शासकीय निवासस्थानामध्ये ३० कॉटेज कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांचे आहे. तर, नागभवनमध्ये १६ कॉटेज राज्यमंत्र्यांसाठी आरक्षित आहे. हिवाळी अधिवेशनाच्या काळात मंत्र्यांचा याच निवासस्थानी अधिवास असतो. रविभवन च्या एका कॉटेजच्या मेंटनन्सवर वर्षाला ३ ते ५ लाख रुपये खर्च होतो. नागभवनमध्येही वर्षाला २ ते ३ लाख रुपये मेंटनन्सवर खर्च होतात. तरीही मंत्र्यांच्या घरांना वाळवी लागलेली आहे.

राज्यातील मंत्र्यांचे रविभवन व नागभवनातील निवासस्थानांना धोका निर्माण झाला आहे. निवासस्थानांची छत कोसळण्याच्या स्थितीत आहे. निवासस्थानांची परिस्थिती गंभीर झाल्याने सार्वजनिक निर्माण विभागाच्या (पीडब्ल्यूडी) कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. विभागाने व्हीएनआयटीला पत्र लिहून सर्व इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची विनंती केली आहे.

Operation Prahar : अकोला पोलिसांचे ‘ऑपरेशन प्रहार’; अवैधतेचा अंत, प्रहाराचा प्रारंभ

गेल्या आठवड्यात उद्योगमंत्री उदय सामंत यांना आरक्षित रविभवनातील कॉटेज क्रमांक १३ च्या छताचा भाग तुटून पडला होता. त्यावेळी कुणीच नसल्याने कुठलीही हानी झाली नाही. मात्र, पीडब्ल्यूडीला त्याचा धक्काच बसला. लगेच पीडब्ल्यूडीने काही कॉटेजचे सिलींग उघडून तपासणी केली.

Makrand Jadhav-Patil : आपत्तीचा काळ आहे, थेट लोकांमध्ये जा

त्यावेळी काही धक्कादायक तथ्य पुढे आले. छताचा पीओपी चांगल्या स्थितीत आहे. पण त्याच्या आतली लाकडी रचना वाळवीने खाऊन टाकली आहे. थोडाजरी भार पडला की, पीओपीचा ढाचाच खाली पडू शकतो. कॉटेजची ही अवस्था बघून अधिकारी अलर्ट झाले आहे. त्यांनी व्हीएनआयटीला पत्र लिहून दीड महिन्याच्या आत सर्व कॉटेजचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची विनंती केली आहे.

Operation Sindoor : ३०० किलोमीटर आत घुसून हत्याकांड करून अतिरेकी परत गेले कसे ?

रविभवनातील कॉटेज वेगवेगळ्या काळात व आवश्यकतेनुसार बनविण्यात आले. १९५१ व १९५६ मध्ये मुख्य इमारत बनली. तर कॉटेजचे बांधकाम १९६१ ते १९७१ मध्ये झाले. तेव्हा लाकडी छत बनविण्यात आले होते. त्यानंतर आय शीट, ॲल्युमिनियम शीट व पीओपी करण्यात आले. या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष असल्याने येथे वाळवीचा प्रकोप जास्त आहे, तरीही दरवर्षी कीटकनाशक मारले जाते. मात्र, छताला पीओपीचे आवरण असल्याने तिथे किटकनाशक मारणे शक्य नाही.