Breaking

Ravi Rana : रवी राणांच्या गुगलीने राजकीय वर्तुळात संभ्रम

Ravi Rana’s googly creates confusion in political circles : स्वाभीमानी पक्षाच्या मेळाव्यात भाजपचा उदोउदो

Amravati “महायुतीत भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ आहे. त्यामुळे आगामी अमरावती महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करूनच युवा स्वाभिमान पार्टी लढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या शब्दानुसार, अमरावती महापालिकेत भाजपचाच महापौर होणार असून, जिल्हा परिषदेतही भाजपचाच अध्यक्ष असेल,” असा ठाम दावा आमदार रवी राणा यांनी केला.

राजांच्या या राजकीय गुगलीने सारेच संभ्रमात पडले आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी राणा माहायुतीत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू असे जाहीर केले होते. शेगाव नाका येथील अभियंता भवनात युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते. या वेळी त्यांनी अनेक राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका मांडली.

Chandrashekhar Bawankule : नेत्यांच्या मागे फिरून तिकीट मिळणार नाही

“नवनीत राणा या भाजपच्या नेत्या आहेत, तर मी स्वतः युवा स्वाभिमान पार्टीकडून आमदार आहे. आम्ही वेगवेगळ्या पक्षांत असलो तरी महायुतीच्या ध्येयासाठी एकत्र आहोत. त्यामुळे एकाच घरात दोन पक्ष असले तरी यात कोणताही विरोधाभास नाही. कोणीही यात खोडा घालण्याचा प्रयत्न करू नये,” असे सूचक विधान आमदार राणांनी केले.

“महापालिका निवडणुकीत युवा स्वाभिमान पार्टी ही भाजपसोबतच असेल. राष्ट्रवादी काँग्रेससोबत कोणतीही युती होणार नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले. “युवा स्वाभिमान पार्टी लहान असली तरी ती भाजपसारख्या मोठ्या पक्षासोबत खंबीरपणे उभी आहे,” असेही ते म्हणाले.

गेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात राणा म्हणाले, “अमरावतीत फेरफटका मारला असता, तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा १० हजार मतांनी पराभव केला असता. त्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांचे मला फोन आले होते. त्यामुळे महायुतीचा धर्म राखत मी थोडा शांत झालो होतो.”

Amravati Administration : किती हा पाण्याचा उपसा? आता विहिरी खोदायच्या नाहीत

“दादागिरीची भाषा करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे की, ब्राऊंड्रीवर पास होणाऱ्यांनी मोजके बोलावे,” असा टोलाही आमदार राणांनी विरोधकांवर लगावला. त्यांनी कुणाचेही नाव घेतले नसले तरी संकेत मात्र स्पष्ट होते.