Ravi Rana : १११ फूट उंच हनुमान मूर्ती, उभारणी अंतिम टप्प्यात !

Ravi Rana’s initiative was launched because Uddhav Thackeray opposed the recitation of Hanuman Chalisa : हनुमान चालीसा पठणाला उद्धव ठाकरेंनी विरोध केला होता म्हणून रवी राणांचा उपक्रम

Amravati : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालिसाचे पठण करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तेथे झालेल्या वादानंतर तत्कालीन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा 14 दिवस कारागृहात टाकले होते. त्यानंतर अमरावतीमध्ये १११ फूट उंच हनुमानाची मूर्ती उभारण्याचा संकल्प आमदार राणा यांनी केला होता. आता या मूर्तीचे काम अंतिटप्प्यात आहे.

१११ फूट उंच हनुमान मूर्तीची उभारणी अंतिम टप्प्यात आली आहे. याचे काम 99 टक्के पूर्ण झाले. लवकरच या मूर्तीचे लोकार्पण गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी काल (१२ एप्रिल) अमरावती येथे माध्यमाशी बोलताना दिली. महाराष्ट्रातील ही सर्वात उंच हनुमान मूर्ती असल्याचा दावा करण्यात आमदार राणा यांनी केला आहे.

Ganesh Naik : धोटीवाडा येथुन जंगल सफारी सुरु करा

जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे अमरावतीला विमान व हेलिकॉप्टरने येतील तेव्हा त्यांना 111 फूट हनुमानजींची मूर्ती दिसेल. हनुमान चालीसाला विरोध करणारा पहिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे, अशी टीका रवी राणा यांनी केली. अमरावतीच्या छत्री तलावानजीक उभारण्यात येत असलेली ही मूर्ती अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. 50 एकर परिसरात १११ फूट उंच मूर्तीची उभारणी दोन वर्षांपासून सुरू आहे.

Ashish Deshmukh : नागपूर जिल्ह्यात होणार फर्टीलायझर कॉम्प्लेक्स !

मूर्ती उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. ही मूर्ती एक किलोमीटर अंतरावरूनदेखील पाहता येते. पाऊस आणि उन्हापासून मूर्तीचे संरक्षण करण्यासाठी लेप लावण्याचे काम शिल्लक आहे. राजस्थानचे शिल्पकार ताराचंद शर्मा यांच्या नेतृत्वात दररोज १५ कामगार काम करत आहेत. या मूर्तीच्या जागेजवळील ३० एकरच्या संकुलात राम वाटिका तयार केली जात असल्याचेही आमदार राणा यांनी सांगितले.