Citizens are suffering due to the poor condition of the roads : तुपकरांनी मांडले रस्त्यांचे वास्तव; आंदोलनाचा इशारा
Buldhana मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरात रस्त्यांची दुरवस्था, खड्डे, चिखल, साचलेले पाणी आणि अस्वच्छता यामुळे जनतेला अक्षरशः नागरी संकटाचा सामना करावा लागत आहे. तेलगू नगर ते टिपू सुलतान चौकदरम्यानचा रस्ता खड्डेमय बनल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गुरुवारी पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांची भेट घेत तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.
शहरातील पावसामुळे उखडलेले रस्ते, ठिकठिकाणी साचलेले पाणी, अपघातप्रवण खड्डे आणि सांडपाण्याचा निचरा न झाल्याने घाणीचा सुळसुळाट झाला आहे. महिलांपासून विद्यार्थ्यांपर्यंत अनेकांना अपघाताचा फटका बसला आहे. या सगळ्यामुळे आरोग्यावरही गंभीर परिणाम होत आहे.
Local Body Elections : विधानसभेतील अंतिम मतदार यादीच ‘फायनल’!
रविकांत तुपकर यांनी या समस्यांचा आढावा घेत मुख्याधिकाऱ्यांसमवेत सविस्तर चर्चा केली. “शहराच्या रस्त्यांची अवस्था पाहून जिल्हा मुख्यालयास शोभेल, अशी एकही गोष्ट उरलेली नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिली. तुपकर यांनी इशारा दिला की, रस्त्यांची डागडुजी व शहर स्वच्छता कामे वेळेत पूर्ण न केल्यास पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल.
शहराच्या गंभीर परिस्थितीविषयी अद्याप कोणत्याही लोकप्रतिनिधीकडून ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. त्यामुळे नागरी भागातील लोकांमध्ये प्रशासनाबाबत आणि लोकप्रतिनिधींबाबत नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Vidarbha Farmers : ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेताचा झाला तलाव!
ऍड. राज शेख, दिलीप राजपूत, अतुल तायडे, मोहम्मद दानिश अजहर, मिर्झा नावेद, फरदीन लाला, नदीम शेख, नवाज मिर्झा, चंद्रशेखर देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.