Breaking

Ravikant Tupkar : कर्जमुक्ती पीक विम्यासाठी सिंदखेडराजात ‘क्रांतिकारी’चा एल्गार !

‘Krantikari’ to hold protest in Sindkhedraj tomorrow for debt-free crop insurance : शेतकरी नेते रविकांत तुपकरांची तोफ धडाडणार

Buldhana : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी हळूहळू वातावरण पेटत आहे. महायुतीने शब्द देऊनही कर्जमाफी दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. संपुर्ण कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा, या दोन मुख्य मागण्यांसाठी मंगळवारी (ता. २७ मे) मातृतिर्थ सिंदखेडराजा येथे शेतकऱ्यांचा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवारी होणाऱ्या मेळाव्यात शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी राज्यभर एल्गार पुकारला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी एल्गार मेळावे घेऊन शेतकऱ्यांना एकत्रित करून सरकारवर दबाव वाढवण्याचे काम तुपकरांनी सुरू केले आहे.

Nagpur Municipal Corporation : नाईक तलावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी मनपाची धडपड!

सिंदखेड राजा येथे मंगळवारी सकाळी ११ वाजता सावता भवनमध्ये हा मेळावा होणार आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा तातडीने त्यांच्या खात्यात जमा करावा, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेती पिकांची नुकसान भरपाई तातडीने द्यावी, सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी, शेती पिकांचे जंगली जनावरांपासून रक्षण करण्यासाठी शेतीला मजबूत कम्पाऊंड करावे, सोयाबीनला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक द्यावा, शेतमजुरांना विम्याचे कवच द्यावे यांसह विविध मागण्यांसाठी राज्यभर हा एल्गार पुकारण्यात आहे.

Flood situation : बोर्डा, चिचपल्लीची पुनरावृत्ती होऊ नये, मामा तलाव तातडीने दुरूस्त करा !

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाल्याशिवाय आणि त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. संपूर्ण कर्जमुक्ती आणि ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही, त्या शेतकऱ्यांनी आपल्या पावत्या घेऊन सिंदखेडराजा येथे यावे, असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे.