Breaking

Ravikant Tupkar on Prataprao Jadhav : जाधव यांना मंत्रिमंडळातून काढा, नाहीतर पंतप्रधानांच्या घरापुढे आंदोलन!

Warning of protest in front of the Prime Minister’s house : तुपकरांचे जाधवांवर गंभीर आरोप; जिल्हाध्यक्षांच्या तडीपारीसाठी दबावाचा आरोप

Buldhana क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्षासाठी तडीपार करण्यासाठी केवळ आणि केवळ केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जबाबदार आहेत. त्यांच्या राजकीय दबावामुळेच मेहकर ‘एसडीओ’ SDO यांनी ही कारवाई केली आहे. सुडाचे राजकारण करणाऱ्या मंत्री जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळावे, या मागणीसाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करू, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

बुलढाणा येथील शासकीय विश्रामगृहात सोमवार, दि. १० मार्चला तुपकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी नव्या आंदोलनाची घोषणा करून जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या कारवाईच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis व त्यांच्या अख्त्यारितील गृह विभागाला बदनाम करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

Parinay Fuke : बहिणी खुश होणार, बेरोजगारी दूर होणार!

यावेळी बोलताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केंद्रीय मंत्री जाधव यांच्यावर टिकेची झोड उठवत गंभीर आरोप केले. “मंत्री जाधव हे खुनशी स्वभावाचे राजकारणी असून त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव आणून टाले यांना तडीपार केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मला अपक्ष म्हणून अडीच लाख मते मिळाली,’ असं तुपकर म्हणाले.

जाधव यांच्या मेहकर विधानसभा मतदारसंघात युती आणि आघाडीच्या बरोबरीने मतदान झाले. यात टाले यांचा मोठा वाटा होता. त्यामुळेच त्यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून टाले यांना तडीपार केले, असा आरोप तुपकर यांनी केला.

“एक गुन्हा सोडला, तर टाले यांच्यावरील इतर गुन्हे राजकीय स्वरूपाचे आणि शेतकरी आंदोलनाशी संबंधित आहेत. जिल्ह्यात अनेक जणांवर २०-२० गुन्हे आहेत, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही. फडणवीस यांच्या गृह खात्याला बदनाम करण्याचा हा डाव आहे,” असा आरोप त्यांनी केला.

१९ मार्चला मुंबईत आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना येत्या १९ मार्च रोजी मुंबईत आंदोलन छेडणार असल्याची घोषणा तुपकर यांनी केली. “अठरा तारखेला आम्ही शेकडो कार्यकर्त्यांसह मुंबईकडे कूच करू. अरबी समुद्रात सोयाबीन आणि सातबारे बुडवू,” असा इशाराही त्यांनी दिला.

Mahayuti Government : विदर्भाला भरघोस, विकसित महाराष्ट्राचा संकल्प!

ईडीच्या कारवाईचा इशारा
“केंद्रीय मंत्र्यांनी अफाट माया जमा केली आहे. त्यांना ईडीची भीती वाटते. त्यांच्या सर्व घोटाळ्यांचा आम्ही पर्दाफाश करू. त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचाही आम्ही पर्दाफाश करू,” असा इशारा देत तुपकर यांनी मंत्री जाधव यांच्यावर थेट आरोप केला.

“टाले यांची तडीपारी म्हणजे माझ्या विरोधात कोणी गेले, तर मी काय करू शकतो, हे दाखवण्याचा प्रकार आहे. जाधव यांना बुलढाण्याचा बीड जिल्हा करायचा आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.