Breaking

Ravikant Tupkar : रविकांत तूपकरांच्या वाहनाला अपघात

Tupkar met with accident : तुपकरांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

Buldhana स्वाभिमानी क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या ‘लोकरथ’ वाहनाला मागून ट्रकने धडक दिल्याची घटना वाशी तालुक्यातील पारेगाव टोलनाक्याजवळ मध्यरात्री घडली. या अपघातात तूपकर थोडक्यात बचावले असले तरी त्यांच्यासोबत असलेले स्वीय सहाय्यक कार्तिक सवडतकर आणि संघटनेचे पदाधिकारी गजानन नाईकवाडे हे जखमी झाले आहेत.

अपघातानंतर तुपकर यांनी थेट विरोधकांकडून घातपाताचा संशय व्यक्त करताच जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दि. 17 मे रोजी अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे सभा आटोपून तूपकर लातूरहून जालन्याकडे निघाले होते. मध्यरात्री पारेगाव टोलनाक्याजवळ त्यांच्या इनोव्हा वाहनाला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात लोकरथचे मोठे नुकसान झाले असून, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

CM Devendra Fadnavis : निवडणुका आल्या, जनता दरबारात गर्दी वाढली!

घटनेनंतर तुपकर यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत हा साधा अपघात नसून त्यामागे राजकीय कट असल्याचा संशय व्यक्त केला. सत्ताधारी गटावर त्यांनी नाव न घेता आरोप केला.

Nago Ganar : माजी आमदाराची एसआयटी चौकशीची मागणी!

या घटनेनंतर स्वाभिमानी क्रांतिकारी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, जिल्ह्यातील अनेक ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन तपास सुरू केला असला तरी तूपकरांच्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वाढत आहे. आगामी काळात या प्रकरणाचा राजकीय भूकंप किती मोठा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.