Warning to the government at the farmers’ gathering : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून तुपकरांचा सरकारवर हल्लाबोल
Shegaon शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन संत नगरी शेगावमध्ये आज (१० जून) आयोजित शेतकरी मेळाव्यात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती, पीकविमा आणि नुकसानभरपाईच्या मुद्द्यावर तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेत, सरकारला थेट इशारा दिला की, “जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे मुश्कील करू.”
तुपकर म्हणाले, ‘अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने १०० टक्के नुकसानभरपाई तात्काळ द्यावी. लाखो शेतकरी अजूनही पीकविम्यापासून वंचित आहेत. त्यांना संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे. तसेच, सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी दिली पाहिजे, हे सरकारचे वचन आहे.’
Vatsavitri Pournima : भांडकुदळ बायको नकोच; पुरुषांच्या पिंपळाला उलट्या फेऱ्या
तुपकर यांनी सोयाबीन व कापसाला प्रती क्विंटल ₹३००० हमीभाव पुन्हा लागू करण्याची जोरदार मागणी केली. तसेच, जंगली प्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता शेतशिवारांना मजबूत कंपाउंड आणि शेतमजुरांसाठी संरक्षणाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
या एल्गार सभेला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. “क्रांतिकारी शेतकरी संघटना आता संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक झाली आहे. आम्ही मागील काही महिन्यांपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात दौरे करत आहोत. शेतकऱ्यांचे हक्क मिळवण्यासाठी लढत राहणार,” असे तुपकर म्हणाले.
Vidarbha farmers : शेतकऱ्यांचे बीज बिल माफ करा, अन्यथा तीव्र आंदोलन!
सभेच्या अखेरीस त्यांनी सरकारला इशारा दिला — ‘सरसकट कर्जमुक्ती आणि पीकविमा दिला नाही, तर मंत्र्यांच्या दौऱ्यांवर आम्ही घोंगडं घालू. सरकारच्या छाताडावर बसून हक्क मिळवून घेतल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही.’