The installments of citizens taking vehicle and home loans will remain the same : वाहन, गृहकर्ज घेणाऱ्या नागरिकांचा हप्ता राहणार ‘जैसे थे’
Mumbai : भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपल्या द्वैमासिक पतधोरणाची घोषणा केली असून, सध्याचा रेपो रेट जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सध्या रेपो रेट 5.50 टक्क्यांवर कायम राहणार आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्या नागरिकांच्या हप्त्यांमध्ये कोणताही बदल होणार नाही.
गेल्या दोन बैठकींमध्ये रिझर्व्ह बँकेने सलग रेपो रेटमध्ये कपात केली होती. जून महिन्यात रेटमध्ये 0.50 टक्क्यांची घट झाली होती आणि तो 6 टक्क्यांवरून 5.50 टक्क्यांवर आला होता. त्यामुळे यावेळेसही आणखी कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेपेक्षा कमी असून अर्थव्यवस्था स्थिर आहे, त्यामुळे सध्या दरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Water crisis : शेगाव तालुक्यातील ३८ गावे पाण्याविना, आरोग्याला धोका
गेल्या दोन दिवसांपासून रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक मुंबईत सुरू होती. या बैठकीनंतर आज पतधोरण जाहीर करण्यात आले. रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक देशातील इतर बँकांना देत असलेल्या अल्पकालीन कर्जावरचा व्याजदर. यावर बँकांचे कर्जाचे दर ठरतात. त्यामुळे रेपो रेटमध्ये बदल झाला की सामान्य ग्राहकांवर त्याचा थेट परिणाम होतो.
सध्या रिझर्व्ह बँकेने कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांच्या गृहकर्ज, वाहन कर्ज यावर प्रभाव पडणार नाही. व्याजदर जैसे थे राहणार असल्यामुळे हप्तेही सध्या जसेच्या तसे राहणार आहेत. या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी व्याजदरात कपात होण्याची अपेक्षा ठेवणाऱ्यांना मात्र थोडी निराशा झाली आहे.
Ladki bahin yojana : जिल्ह्यातील ५१ हजार लाडक्या बहिणींची ‘ओवाळणी’ होल्डवर!
रिझर्व्ह बँकेकडून पुढील पतधोरण काही आठवड्यांत जाहीर होणार असून, त्या वेळी देशातील आर्थिक घडामोडी आणि महागाईचा दर पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या तरी पतधोरणात स्थैर्य राखण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतल्याचे स्पष्ट होत आहे.