Breaking

Republic Day Parade : चिल्हाटीच्या सरपंचांना दिल्लीचं निमंत्रण!

 

Invitation to Sarpanch of Chilhati for republic day program : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहणार

Deori : प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळायला नशीब लागतं. हे नशीब देवरीतील चिल्हाटीच्या सरपंचांना लाभलं आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण सरपंचांना मिळालं आहे. त्यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायतने केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही नोंद असल्याचे म्हटले जात आहे.

देवरी तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या चिल्हाटी येथील सरपंच पुस्तकला राजकुमार मडावी यांना केंद्र सरकार व संचालक पंचायत राज महाराष्ट्र राज्य पुणे द्वारा विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. चिल्हाटी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तारेश कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजना या ग्रामपंचायतने उत्कृष्टपणे राबविल्या.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणतात, २६ जानेवारीपूर्वी मिळतील पालकमंत्री!

या सर्व उपक्रमांची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. दिल्ली येथील कर्तव्य पथकावरील कार्यक्रमास विशेष निमंत्रित म्हणून आमंत्रण सरपंच पुस्तकला मडावी यांना पाठविले आहे. त्यामुळे हा समस्त चिल्हाटी गावाचा सन्मान असल्याचे मडावी यांनी म्हटले आहे. चिल्हाटी ग्रामपंचायतने गावात विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले आहेत. १०० टक्के करवसुली करणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत अशी ओळख निर्माण केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष अतिथी म्हणून मान मिळाल्याने चिल्हाटी गावाच्या शिरपेच्या मानाचा तुरा रोवला आहे.

Washim Zilla Parishad : प्रशासकच सादर करणार अर्थसंकल्प!

पंचायतराज मंत्रालयाकडून होणार गौरव
शाश्वत विकास उद्दिष्टांच्या नऊ विषयांवर आणि महत्त्वाकांक्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये चांगले काम करणाऱ्या सरपंच म्हणून पुस्तकाला मडावी यांची नोंद घेतली गेली आहे. त्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. त्या केवळ प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. तर पंचायत राज मंत्रालयाकडून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील दुसऱ्या सरपंच
दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्यासाठी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतच्या सरपंच सागरबाई चिमनकार यांना आमंत्रीत करण्यात आले आहे. त्यानंतर आता चिल्हाटीच्या सरपंच पुस्तकला मडावी यांना आमंत्रीत केल्याने जिल्ह्यातून प्रथमच दोन सरपंचाना ही संधी मिळाली आहे.