Breaking

Republican Party of India : रिपब्लिकन पक्षाला सामाजिक संघटनांचा आधार!

RPI will contest the elections along with social organizations : निवडणुकीत घेणार मदत; संयुक्त आघाडी स्थापन करणार

Nagpur नागपूर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस किंवा भाजपचीच सत्ता राहिली आहे. आता तर तीन टर्म भाजपच सत्तेत आहे. अशात शिवसेना आणि राष्ट्रवादीलाच जिथे धडपडावे लागत आहे, तिथे इतर पक्षांचे काय होणार हा प्रश्न आहेच. अशात रिपब्लिकन पक्षाने नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सामाजिक संघटनांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वास त्यांना आहे.

रिपब्लिकन सोलडिरिटी मूव्हमेन्ट आणि राष्ट्रीय एकता आंदोलनतर्फे एक बैठक घेण्यात आली. रिपब्लिकन पक्षांचे विविध गट आणि सामाजिक व कामगार संघटना मिळून आगामी महापालिकेची निवडणूक लढणार आहेत. यासाठी विविध राजकीय, सामाजिक कामगार संघटनांची संयुक्त आघाडीसुद्धा निर्माण करण्यात आली.

Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे निर्देश; आवास योजनेतील अडचणी दूर करा!

आगामी मनपा निवडणुकीत स्वबळावर व समविचारी संघटनांसोबत चर्चा करून एकास एक उमेदवार देऊन निवडणूक लढविण्याचा निर्णयसुद्धा बैठकीत घेण्यात आला. यासोबतच आघाडीतर्फे नागरिकांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन करण्यात येईल. येत्या २० जून रोजी पुन्हा बैठक घेऊन त्यात कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार आहे.

जन सुरक्षा कायदा २०२४ रद्द करणे, नवीन कामगार कायदा रद्द करणे, सर्वांना मोफत शिक्षण, बेरोजगारांना रोजगार, व इतर प्रश्नावर येत्या २७ जून रोजी धरणे आंदोलन करण्याचा निर्णयसुद्धा यावेळी घेण्यात आला. बसपानेदेखील मनपा निवडणूकीत स्वबळावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. सोबतच बहुजन वंचित आघाडीने अद्यापपर्यंत पत्ते उघड केलेले नाहीत. त्यामुळे रिपब्लिकन मतांचे मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची चिन्हे आहेत.

Nagpur Municipal Corporation : कंत्राटदारांची हिंमत वाढली होती; महापालिकेने ठोठावला दंड

कर्मचाऱ्यांचे नेते अरुण गाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत आंबेडकरी विचारवंत प्रा. एन. व्ही. ढोके, ज्येष्ठ रिपब्लिकन नेते घनश्याम फुसे, अमृत गजभिये, प्रसिद्ध आंबेडकरी प्रबोधनकार अनिरुद्ध शेवाळे, संविधान परिवारचे प्रा. राहुल मून, राष्ट्रीय मुस्लिम परिषदचे प्रा. जावेद पाशा, राष्ट्रीय ओबीसी महासंघांचे प्रा. रमेश पिसे, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडेरेशनचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. मधुकर उईके प्रामुख्याने उपस्थित होते.