Breaking

Request made after receiving funds : भाजपचे वरातीमागून घोडे, निधी मिळाल्यावर केली मागणी !

Vanchit Bahujan Aghadi criticizes BJP : केवळ श्रेय लाटण्याचा उद्देश, आधी बाळगले होते मौन

Akola : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत. अशात सर्वच राजकीय पक्षांची धडपड चाललेली आहे. आम्हीच कसे तत्पर, हे दाखवण्यासाठी वाट्टेल ते केले जात आहे. यामध्ये भाजपचे मात्र वरातीमागून घोडे चालत आहे. कारण घरकुलासाठी निधी मिळाल्यानंतर भाजप नेत्यांनी निधीची मागणी केली. यावरून हे सर्व फक्त निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन केले जात आहे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत तेल्हारा नगर परिषदेच्या हद्दीतील पात्र नागरिकांसाठी घरकुलांची कामे सुरू आहेत. काही लाभार्थ्यांचे बांधकाम पूर्ण झाले असले, तरी अनेकांनी निधीअभावी बांधकाम थांबवले आहे. या पार्श्वभूमीवर नुकताच शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी घरकुल लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान वितरित करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन नगर परिषदेला सादर केले. मात्र, या मागणीमागे श्रेय लाटण्याचा उद्देश असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे.

Rahul Gandhi : महाराष्ट्र विधानसभेत ‘मॅच फिक्सिंग’ सारखी हेराफेरी : राहुल गांधी

वंचित बहुजन आघाडीचे शहर महासचिव प्रवीण पोहरकार यांनी भाजपच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे. “अनेक महिने निधी मिळत नसताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगले होते. आता निधी मिळाल्याचे स्पष्ट होताच अचानक जाग येऊन मागणी करण्याचा प्रकार म्हणजे केवळ श्रेय घेण्याचा प्रयत्न आहे,” असा आरोप त्यांनी केला.

शहरातील अनेक भागांत नागरिक अद्याप मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गुंठेवारी नियमितीकरण, प्रभाग आरक्षण तसेच मालमत्ताधारक व स्टॅम्पधारकांना अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. केंद्र व राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना ही संकटे दिसत नाहीत काय, असा सवाल वंचितने उपस्थित केला आहे.

Dcm eknath shinde : किडनी विकाराने ग्रस्त लाडक्या बहिणीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मदत

“नागरिकांनी आंदोलने करून प्रश्न मार्गी लावल्यास त्याचे श्रेय भाजप पदाधिकाऱ्यांकडून घेतले जाते, हे प्रकार पुन्हा पुन्हा घडताना दिसत आहेत. पुढे यापुढे जनतेच्या भावनांशी खेळ करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज आहे,” असा इशाराही पोहरकार यांनी दिला आहे.