Another youth ends his life after not getting caste certificate : जात प्रमाणपत्र न मिळाल्याने आणखी एका तरुणाने जीवन संपवल
Mumbai : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाढती अस्वस्थता दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यात महादेव कोळी समाजातील शिवाजी वाल्मिक मेळ्ळे (३२) या तरुणाने जातीचं प्रमाणपत्र न मिळाल्याने आत्महत्या केली. याआधी ओबीसी समाजातील भरत कराड या तरुणाने आणि बंजारा समाजातील पवन चव्हाण याने आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. सलग तीन समाजातील तरुणांनी आत्महत्या केल्याने राज्यातील आरक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे.
निलंगा तालुक्यातील दादगी गावातील शिवाजी मेळ्ळे मजुरी करून संसार चालवत होते. त्यांनी आपल्या दोन मुलांसाठी महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गेल्या वर्षभरापासून प्रयत्न केले, मात्र प्रमाणपत्र न मिळाल्याने मुलांना शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या. या मानसिक तणावातून त्यांनी विजेच्या करंटचा शॉक घेऊन जीवन संपवलं.
Reservation controversy : धनगर, बंजारांना एसटी आरक्षण दिल्यास राजीनामा देणार !
त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, “माझी दोन लेकरं शिकायला आहेत. मी मजुरी करून घर चालवतोय. लेकराला महादेव कोळ्याचं प्रमाणपत्र मिळत नाही, सरकार प्रमाणपत्र देत नाही… म्हणून मी करंटला धरून जीवन संपवतोय.” या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त होत असून शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
Sachin Sawant : आमची जागा आरबीआयला विकण्याचा व्यवहार रद्द करा, काँग्रेसची मागणी
लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील भरत कराड या तरुणाने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळाल्यास ओबीसी समाजाचं आरक्षण संपुष्टात येईल या भीतीपोटी त्यांनी मांजरा नदीपात्रात उडी घेतली. आपल्या आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोटमध्ये “माझ्या पाठीमागे तरी कुटुंबाला आणि ओबीसी समाजाला न्याय द्या” असं लिहिलं होतं.
या सलग घटनांमुळे राज्यातील आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. In








