Jarange Patils firm stance against criticism from many : अनेकांच्या टिके वर जरांगे पाटील यांची ठाम भूमिका
Chhatrapati Sambhajinagar : मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात निर्णायक घडामोड झाली आहे. राज्य सरकारने हैद्राबाद गॅझेट लागू करत जीआर काढल्यानंतर उपोषणावर बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठा दिलासा मिळाल्याचे सांगत आपले उपोषण मागे घेतले. सरकारच्या या निर्णयामुळे आता मराठा समाजाला ओबीसीत आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
“सरकारने काढलेला जीआर पक्का आहे. त्यामुळे सर्व मराठे ओबीसीत जाणार म्हणजे जाणार,” असा ठाम विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. तसेच, “काही जण अफवा पसरवत आहेत, त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा. मराठ्यांनी शांतता, संयम आणि विश्वास ठेवावा,” असाही सल्ला त्यांनी दिला.
Reservation controversy : ‘तो’ पर्यंत सगळ्यांना गुंडाळण्यात आलं होतं !
जरांगे म्हणाले, मराठ्यांनी जीवाची बाजी लावून ही लढाई लढली आणि जिंकली. मी नाममात्र आहे, खरं श्रेय संपूर्ण मराठा समाजाचं आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठे ओबीसी आरक्षणात जातील यात अजिबात शंका नाही. कुणी शंका ठेवू नये. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यासाठी सरकारने समिती केली आहे. मी मराठा समाजाचं वाटोळं करणार नाही.
जर जीआरमधील एखाद्या शब्दात त्रुटी असेल तर लगेच सुधारित जीआर काढू, असा शब्द सरकारने व्यासपीठावर दिला असल्याचं जरांगे यांनी सांगितलं. 58 लाख नोंदी, तीन कोटी मराठ्यांसाठी आरक्षण, मोफत शिक्षण, बार्टीमार्फत निधी हे सगळं जर सरकारनं दिलं नसतं तर आज आपण इथपर्यंत पोहोचलो नसतो, असं ते म्हणाले.
जरांगे यांनी सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्यांवरही जोरदार निशाणा साधला. समाजासाठी कधीच काही न करणारे लोक आता आरक्षणाबाबत खोटं पसरवत आहेत. 70 वर्षात त्यांनी मराठ्यांसाठी काही दिलं नाही. अशा किडे-मकोड्यांकडे लक्ष न देता, योग्य निर्णय होईल यावर विश्वास ठेवा, असा सल्ला त्यांनी दिला.
Gunaratna Sadavarte : मराठा आरक्षणाच्या निर्णयावर सदावर्ते आक्रमक
मला आणि समाजाला एकमेकांपासून तोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण मी जिवंत आहे तोवर मराठा समाजाचं कल्याण करणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमचं वाटोळं करणार नाही, असा विश्वास जरांगे यांनी दिला.








