Reservation controversy : धनगर, बंजारांना एसटी आरक्षण दिल्यास राजीनामा देणार !

Direct warning from Shiv Sena Shinde faction MLA : शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांचा थेट इशारा

Mumbai : आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकारण तापलं असून बंजारा व धनगर समाजाच्या मागण्यांवरून वाद अधिक चिघळण्याची चिन्हं आहेत. मराठा आरक्षणासाठी लागू केलेल्या हैदराबाद गॅझेटच्या आधारे बंजारा समाजाने अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याची मागणी केली आहे. त्यावर शिवसेना शिंदे गटाचे नंदूरबारचे आदिवासी आमदार आमश्या पाडवी यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.

“बंजारा आणि धनगरांना जर एसटी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर मी सरकारमधून बाहेर पडेन. मी आमदार आहे तोपर्यंत कुणालाही अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये घुसू देणार नाही,” असा थेट इशारा आमदार पाडवी यांनी दिला.

Local Body Elections : महिला आरक्षणामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’!

त्यांनी स्पष्ट केलं की, आदिवासी बनण्यासाठी आदिवासींच्याच पोटी जन्म घ्यावा लागतो. आंदोलन करून किंवा शासन निर्णयाच्या आधारे कुणी आदिवासी होऊ शकत नाही. त्यामुळे बंजारा व धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यास विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, मराठा समाजासाठी कुणबी नोंदींचा जीआर काढण्यात आला असून त्यानुसार नोंदी मिळालेल्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. याच आधारे बंजारा समाजाने एसटी आरक्षणाची मागणी केली आहे. धनगर समाजही अनेक वर्षांपासून हीच मागणी करत आहे.

धाराशिव जिल्ह्यातील बंजारा समाजाचा तरुण पवन चव्हाण (३२) याने आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली. तो पदवीधर असून बेरोजगार होता. जालना येथील आंदोलनातून परतल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये पवनने बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारे आरक्षण मिळावं अशी मागणी केली असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.

Sachin Sawant : आमची जागा आरबीआयला विकण्याचा व्यवहार रद्द करा, काँग्रेसची मागणी

पवनच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. या घडामोडींमुळे बंजारा व धनगर समाजाच्या मागण्या अधिक तीव्र होण्याची आणि सरकारसमोर मोठं संकट उभं राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.