Dissatisfaction among OBCs, Bhujbals direct attack : ओबीसीत असंतोष, भुजबळांचा थेट हल्लाबोल
Mumbai : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, राज्य सरकारने काढलेल्या जीआरवरून ओबीसी समाजात असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनीच भाजपाला घरचा आहेर दिला आहे. “माझी नाराजी मंत्र्यांवर नाही, तर जीआरमधल्या वाक्य आणि शब्दांवर आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयात घाई झाल्याचा आरोप केला आहे.
वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेत भुजबळ म्हणाले, “उपसमितीने घेतलेल्या निर्णयाबाबत मला माहिती नव्हती. उपसमितीचे लोक आणि मुख्यमंत्री यांच्याशिवाय कुणाला माहिती असेल तर मला ठाऊक नाही. एका स्फोटक परिस्थितीत दबावाखाली घाईघाईत हा निर्णय झाला. आता जीआरमध्ये स्पष्टता आणण्यासाठी कोर्टाशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नाही.”
Criticism on DCM : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला
मराठा आरक्षणाबाबत आपली नाराजी मंत्र्यांवर नसल्याचे सांगताना भुजबळ पुढे म्हणाले, “जरांगेंचं म्हणणं आहे की आरक्षण ओबीसींमधून द्या. पण ओबीसींमधून कसं देणार? माझी नाराजी याच मुद्द्यावर आहे.”
भुजबळांनी यावेळी थेट भाजपालाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, “हे सरकार भाजपप्रणीत आहे. भाजप नेहमी म्हणते की ओबीसी हा आमचा डीएनए आहे. मग आता त्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांच्या डीएनएला धक्का लागता कामा नये.”
Threat to officials : कारवाईस गेलेल्या महिला आयपीएस अधिकाऱ्याला दम !
जीआरच्या संभाव्य दुरुपयोगाबाबत इशारा देत भुजबळ म्हणाले, “सरकारनं दबावाखाली निर्णय घेतला. याचे परिणाम पुढे दिसतील, कदाचित देशातील इतर राज्यांतही होतील. त्यामुळे स्पष्टता आणण्यासाठी मला कोर्टात जावंच लागेल.”भुजबळांच्या या वक्तव्यामुळे राज्य सरकारच्या भूमिकेबाबत नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.








