Reservation controversy : आरक्षणाच्या जीआरविरोधात छगन भुजबळ न्यायालयात !

Manoj Jaranges warning, will not allow entry into Maharashtra : मनोज जरांगेंचा इशारा, महाराष्ट्रात येऊ देणार नाही

Mumbai : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शासन आदेश काढला. हैदराबाद गॅझेटियर लागू करत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे.

या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी या जीआरविरोधात थेट न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारला आहे. येत्या दोन दिवसांत मुंबई उच्च न्यायालयात भुजबळ यांच्याकडून या शासन आदेशाविरोधात याचिका दाखल होणार आहे. सर्व ओबीसी नेत्यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात येणार असून गेल्या काही दिवसांपासून भुजबळ यांची विविध वकिलांसोबत चर्चा सुरू आहे. याचिकेसाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव पूर्ण झाली असून आता भुजबळ न्यायालयात सरकारविरोधात दाद मागणार आहेत.

OBC Reservation : मराठा आरक्षणानंतर ओबीसी एकटवले !

या घडामोडींवर मनोज जरांगे यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. “आमच्या जीआरला खोडून अडचणी आणल्यास महाराष्ट्रात यांना येऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा रोष सहन करणार नाहीत, असेही ते म्हणाले.

जरांगे यांनी पुढे स्पष्ट केले की, हैदराबाद गॅझेटियरप्रमाणे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करा आणि आवश्यक मनुष्यबळ द्या, अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल. “नेत्यांना आम्ही फिरू देणार नाही. सरकारच्या चुकांमुळे आमच्यावर अडचण येऊ नये. विजय-पराजय पचवता आला पाहिजे. काही लोक बिथरल्यासारखे झाले आहेत,” असे त्यांनी टोला लगावला.

Yelgaon Dam : शेतकरी चढला ३५० फूट उंच टॉवरवर, प्रशासन हादरले!

त्यांनी दसरा मेळाव्याचा उल्लेख करत पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला. “जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर येत्या दसरा मेळाव्यास आम्हाला आमची भूमिका जाहीर करावी लागेल,” असे मनोज जरांगे यांनी ठामपणे सांगितले.