Matang community’s protest in Mumbai on May 20 : आरक्षण उपवर्गीकरणासाठी २० मे रोजी आंदोलन; चिखलीतील बैठकीत निर्धार
Buldhana आरक्षण उपवर्गीकरणासाठी सकल मातंग समाजाने २० मे २०२५ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ‘जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर मोर्चाच्या नियोजनासाठी चिखलीत २९ एप्रिल रोजी श्रीराम सहकारी नागरी पतसंस्था सभागृहात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे संस्थापक आणि शिवसेना नेते विजय अंभोरे होते.
विजय अंभोरे म्हणाले, “राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये जनजागृती करून लाखोंच्या संख्येने मोर्चात सहभागी होण्यासाठी समाजबांधव सज्ज झाले आहेत. आरक्षण उपवर्गीकरणाची चळवळ ही वंचितांसाठी परिवर्तन घडवणारी आहे. प्रत्येक तालुक्यातील मातंग वस्त्यांमधून समाज बांधवांची नावे गोळा करून, त्यांना मोर्चात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत.”
Congress Tractor Morcha : काँग्रेसचा आज ट्रॅक्टर मोर्चा, सरकारी धोरणांचा करणार निषेध!
राज्य समन्वयक प्रा. पंडित सूर्यवंशी (लातूर) यांनी भावनिक आवाहन करत सांगितले की, “आरक्षण उपवर्गीकरण ही भावी पिढीची संधी आहे. ही चळवळ समाजासाठी संजीवनी ठरणार आहे. मातंग समाज व वंचित घटकांनी एकत्र येऊन या ऐतिहासिक लढ्यात उभं राहायला हवं.”
Prahar Janshakti : घागर पूजन करून नगर परिषद प्रशासनाचा निषेध!
बैठकीत विनोद जोगदंड, श्रीकृष्ण शिंदे, सोपान पानपाटील, गजानन पवार, सिंधुताई तायडे, अनिल कांबळे यांच्यासह अनेकांनी आरक्षण उपवर्गीकरणाचे महत्त्व विषद केले. बैठकीस बुलडाणा जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आयोजनाच्या यशासाठी बी. के. खरात, एस. एल. डोंगरे, छोटू कांबळे, निवृत्ती तांबे, ओमप्रकाश नाटेकर, कुंदन यंगड, विजय निकाळजे, रितेश यंगड आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.