Lobbying for the post of Shegaon Taluka and City President : काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे; संघटनात्मक बदलाचे संकेत
Buldhana लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील अपयशानंतर काँग्रेस पक्षात नवसंजीवनी फुंकण्यासाठी संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होत आहेत. जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली तालुका व शहराध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. यामुळे शेगावमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होत आहे.
सध्याचे काँग्रेस शहराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख यांनी अलीकडील एका पक्ष बैठकीत राजीनामा दिल्यानंतर नव्या नेतृत्वाच्या शोधाला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर कैलासबाप्पू गुणवंतराव देशमुख, माजी नगरसेवक प्रफुल ठाकरे आणि डॉ. असलम खान अशी तीन नावे चर्चेत आहेत. परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, कैलासबाप्पू देशमुख यांच्यावर शहराध्यक्षपदासाठी अंतिम मोहोर बसण्याची शक्यता अधिक आहे.
Bhendwal Ghatmandani : शेतकऱ्यांसाठी सावधगिरीचा इशारा, पावसाचा धोका
सध्या काँग्रेसचे शेगाव तालुकाध्यक्ष विजय काटोले असून त्यांच्याऐवजी नवीन चेहरा देण्याचा विचार पक्षश्रेष्ठी करत आहेत. यासाठी विजय दयारामभाऊ वानखडे आणि शिवशंकर गीते यांची नावे आघाडीवर आहेत. ज्ञानेश्वर शेजोले व सैय्यद साजिद यांच्या नावांचीही चर्चा आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये घाटावर आणि घाटाखाली अशी दोन स्वतंत्र जिल्हाध्यक्ष देण्याची संकल्पना पुढे आली आहे.
Teachers appopintment scam : शिक्षक भरती घोटाळ्याचे लोण अमरावतीत
यानुसार घाटाखालून जिल्हाध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष व सध्या काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष असलेले शैलेंद्रदादा पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. शहराध्यक्ष आणि तालुकाध्यक्षपदासाठी पक्षात अंतिम स्तरावर निर्णयप्रक्रिया सुरू आहे. येत्या पंधरवड्यात ही फेरबदल प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेगाव तालुक्यात काँग्रेसचे नवीन संघटनात्मक चित्र कसे असेल याकडे पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.