Breaking

Revenue Department : ५९३ अधिकाऱ्यांना मिळाले लॅपटॉप!

Agricultural works will get speed : महसूलच्या कामाची वाढणार आता गती; शेतीविषयक कामांसाठी लाभदायक

Buldhana महसूलच्या कामांची गती आता चांगलीच वाढणार आहे. आता जिल्ह्यातील ५९३ ग्राम महसूल अधिकाऱ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटरचे मिळाले आहेत. गावातील महसूल विषयक कामकाज आता गतीने होण्यास मदत होणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाने प्रशासकीय कामकाजात गती आणण्यासाठी ई-गव्हर्नन्स उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याचा लाभ शेतीच्या कामांसाठी अधिक होणार आहे.

जिल्ह्यामधील एकूण १३ तालुक्यांमधील ५०४ महसूल अधिकारी व ८९ मंडळ अधिकारी अशा एकूण ५९३ लॅपटॉप व प्रिंटरचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या हस्ते हे वाचप झाले. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात हा वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी (महसूल) समाधान गायकवाड आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ई-गव्हर्नन्स कार्यक्रमांतर्गत डिजिटल इंडिया लँड रेकॅार्ड मॅाडर्नायझेशन प्रोग्रॅम अंतर्गत जमाबंदी आयुक्त कार्यालय यांच्या मान्यतेने या साहित्याचे वाटप करण्यात आले.

23 Gram Panchayats disqualified 103 members : २३ ग्रामपंचायतींनी १०३ सदस्यांना केले अपात्र !

गावपातळीवरील कामांना येणार गती
तलाठी अर्थात ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे नागरिकांची सर्वाधिक कामे असतात. सातबारा, होल्डींग प्रमाणपत्र, फेरफार नक्कल, उत्पन्न दाखला, वारसा नोंद, अशी विविध कामे त्यांना करावी लागतात. परंतु, लॅपटॉप अथवा संगणक नसणे, प्रिंटरचा अभाव यामुळे कामात अडथळा निर्माण होत होता. सर्व ग्राम महसूल अधिकाऱ्यांना स्वतंत्रपणे लॅपटॉप आणि प्रिंटर मिळाल्याने कामात गती येणार आहे.

ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे पद महत्त्वाचे
गावपातळीवर ग्राम महसूल अधिकाऱ्याचे पद महत्वाचे असते. त्यांच्याकडे महसूलच्या रेकाॅर्डसह इतर नाेंदी असतात. त्यासाठी अत्याधुनिक साधनांची आवश्यकता असते. आता ही साधने उपलब्ध झाल्याने महसूलच्या कामांना गती येणार आहे. जिल्ह्यात १३ तालुक असून महसूल मंडळांमध्ये कामे सुरू असतात. गावपातळीवर आता कामांना वेग येणार आहे.