Breaking

Revenue Department : ‘तिसरा डोळा’ पकडणार अवैध गौण खनिज उत्खणन !

‘Third Eye’ will catch illegal minor mineral mining, information from Chandrashekhar Bawankule : प्रायोगिक तत्वावर निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश

Nagpur : अवैध उत्खणनावर नियंत्रण ठेवण्यामध्ये अनेकदा अडचणी येतात. कारण जमीन मोजणी पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे त्यात अनेत त्रुटी राहतात. यावर तोडगा म्हणून एक प्रयोग करण्यात आला. ड्रोनद्वारे केलेल्या सर्वेक्षणात अचुकता आढळून आली. या यशस्वी चाचणीनंतर गौण खनिज उत्खणन होणाऱ्या सर्व खाणींचे ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. म्हणजेच आता अवैध उत्खणनावर ‘तिसरा डोळा’ नजर ठेवणार आहे. यासाठी प्रयोगिक तत्वावर निविदा प्रक्रिया राबवण्याचे निर्देश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.

या प्रयोगाद्वारे राज्यातील अनैध गौण खनिच उत्खणनाला चाप लावला जाईल, असा विश्वास महसूल मंत्र्यांनी व्यक्त केला. येत्या तीन महिन्यांत राज्यातील सर्व खाण पट्ट्यांची मोजणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे अवैध उत्खणनाला आळा घालण्यासोबतच कृत्रिम वाळू निर्मिती प्रकल्पाला गती मिळणार आहे. सर्वेक्षणातून मिळणारी माहिती प्रत्येक तीन महिन्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावी लागणार आहे. ही माहिती तातडीने ‘महाखनिज’ या संकेतस्थळावर अपलोड केली जाणार आहे.

Ajit Pawar NCP : खामगावात सानंदा, अकोल्यात कोण?

ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण केल्यास खाण पट्ट्यांमधील पूर्वीचे खोदकाम, चालू खोदकाम, भविष्यातील खोदकामाची शक्यता आणि उपलब्ध दगड खाणींची सविस्तर माहिती मिळणार आहे. अवैध उत्खणनावर नियंत्रण ठेवणे त्यामुळे सोपे होईल. कृत्रिम वाळू निर्मिती प्रकल्पासारख्या पर्यावरणपूरक उपक्रमांना चालना मिळेल. दगड, मुरूम आणि वाळू यांसारख्या गौण खनिजांचे उत्खणन आणि रॉयल्टी संकलनावर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर म्हणजे एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. खनिज व्यवस्थापनात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.