Breaking

Revenue department tops in bribery : महसूल विभाग लाचखाेरीत अव्वल !

 

Police at number two in corruption : पोलिसांचा नंबर दुसरा; कारवाईतून झाले स्पष्ट

Wardha पोलिस विभागात लाचखोरीचे प्रमाण अधिक असते, हा समज चुकीचा ठरताना दिसत आहे. पोलिस नव्हे तर महसूल विभाग लाचखोरीत अव्वल असल्याचे मागील 11 महिन्यांतील कारवाईतून समोर आले आहे. राज्याचे नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यासंदर्भात कोणती भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

CM Devendra Fadnavis : सर्वाधिक हत्याकांडात गृहमंत्र्यांचे शहर राज्यात तिसरे !

शासकीय कामासाठी लाच घेणाऱ्यांना जरब बसावी, यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळे रचले जातात. लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाते. जानेवारी ते डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १० सापळे रचले होते. हे सर्व सापळे यशस्वी ठरले. यात महसूल विभाग अव्वल आहे.

जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात तब्बल १० कारवाया करण्यात आल्या. यात महसूल विभाग टॉपवर आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मागील ११ महिन्यांत १० कारवाया केल्या. यापैकी पाच प्रकरणांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. शासनाने बहुतांशी योजनांना ‘डीबीटी’ धोरण लागू केले. लाभाचे पैसे थेट खात्यावर जमा होत आहेत. तरीही लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही. वेगवेगळ्या मार्गाने सरकारी कामासाठी पैसे घेतल्याचे कारवायांतून दिसून येत आहे.

Bhandara Police : पोलीस दलातील बदल्यांचा आदेश निघाला !

कोणतंही सरकारी कार्यालय असो, तेथे कार्यरत अधिकारी ते कर्मचारी प्रत्येकाला भरभक्कम पगार आहे. मात्र, तरीही अनेक मंडळी काम मार्गी लावण्यासाठी लाचेची अपेक्षा ठेवतात. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवायांत काही वर्ग दोनचे अधिकारी आहेत. शासनाकडून चांगल्या प्रकारचे वेतन मिळत असताना काही मंडळी लाचेचा मार्ग स्वीकारत असल्याचे यावरून स्पष्ट होते.

शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने, त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने शासकीय काम करून देण्यासाठी लाच मागितल्यास यंत्रणेला कळविण्याची सोय आहे. त्वरित लाचलुचपत विभागाच्या कार्यालयाशी किंवा दूरध्वनी क्रमांकावर तसेच १०६४ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.