Explosive allegations of danve;demands action : दानवेंचा स्फोटक आरोप; चौकश, कारवाईची मागणी
Mumbai : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणाऱ्या सरकारी तांदळाची परदेशात, विशेषतः आफ्रिकन देशांमध्ये तस्करी होत असल्याचा स्फोटक आरोप विधान परिषदेती माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
दानवे यांनी समाजमाध्यमावर या कथित घोटाळ्याचा गौप्यस्फोट करताना सांगितले की, शालेय शिक्षण विभागाच्या संचालक प्राथमिक कार्यालयातील काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने ‘जे. वी. ग्रेन्स डीलर्स’ या नोंदणीकृत संस्थेकडून विद्यार्थ्यांसाठी मिळणारा तांदूळ परदेशात पाठवला जात आहे. या संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार गुप्ता यांच्यावरच हा आरोप आहे. ही संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली असली तरी मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट तिच्याकडे आहे.
दानवे यांनी या प्रकरणात नियमांचे उघड उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवला. संस्थेला मिळणारा नफा सामाजिक उपक्रमाऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी वापरला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, संस्थेत ८० टक्के भागभांडवल असलेले गुप्ता हेच तांदूळ वाहतुकीचे उपकंत्राटदार आहेत. हे उपकंत्राट देताना सर्व नियम धाब्यावर बसवण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दानवे यांनी पुढे नमूद केले की, ‘जे. वी. ग्रेन्स डीलर्स’च्या नावाखाली प्रत्यक्षात कोणतेही सामाजिक काम झालेले नाही. उलट, ५ ऑक्टोबर २०२३ रोजी रेल्वे प्रशासनाने या संस्थेचे एक कंत्राट मुदतीपूर्वीच रद्द करून अनामत रक्कम जप्त केली होती. अशा संस्थेला कोणतेही नवीन टेंडर देता येत नाही, मगही महायुती सरकारचे लाडके लाभार्थी म्हणून गुप्ता यांना कंत्राट कसे मिळाले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Uddhav Balasaheb Thackeray :उद्धव ठाकरेंवर टीका करताना आमदाराची जीभ घसरली
या घोटाळ्याचे फॉरेन्सिक ऑडिट करून संस्थेची नोंदणी रद्द करण्याची मागणी करताना दानवे यांनी दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. सरकारी तांदळाच्या संभाव्य तस्करीच्या या प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात नवा वादळ उठण्याची चिन्हे आहेत.