114 schools of Wardha registered in RTE : वर्धा जिल्ह्यातील ११४ शाळांनी केली नोंदणी
Wardha आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकांतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. यावर्षी सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्राकरिता ११४ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांमध्ये १ हजार २९१ विद्यार्थ्यांना पहिलीत मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशासाठी आज १४ जानेवारीपासून ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली आहे.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. अशा जागांवर दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यासाठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. गतवर्षी शासनाकडून प्रवेशप्रक्रियेत काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. पण, या सुधारणा सोयीच्या कमी आणि अडचणीच्यांच जास्त ठरल्या. त्यामुळे पालकांना न्यायालयापर्यंत धाव घेण्याची वेळ आली. परिणामी प्रवेश प्रक्रियाही बरीच लांबली होती.
Collectorate of Buldhana : सातबाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ऑनलाईन करा अर्ज!
सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्राकरिता वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. १४ जानेवारीपासून पालकांना बालकांचे अर्ज ऑनलाइन सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे पालकांनी तातडीने ऑनलाइन अर्ज सादर करणे अपेक्षित आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर एकाचवेळी ऑनलाइन सोडत काढून प्रत्यक्ष प्रवेशालाही सुरुवात होणार आहे.
Social Media Efect : व्हॉट्सएपवर आवाहन अन् काही तासांत आली मदत!
जिल्ह्यात आरटीईअंतर्गत पहिली आणि नर्सरीकरिता प्रवेश दिला जातो. यामध्ये ११२ शाळांमध्ये १ हजार २४५ विद्यार्थ्यांना पहिलीत तर ०२ शाळांमध्ये ४६ विद्यार्थ्यांना नर्सरीमध्ये मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या दोन्ही प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातून ११४ शाळांनी नोंदणी केली आहे. या शाळांतील २५ टक्के रिक्त जागेवर प्रवेशाकरिता आता पालकांना बालकांचा ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. त्यासाठी १४ ते २७ जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.