Online application process starts for RTE : ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; १०११ जागांसाठी राबवणार प्रवेश प्रक्रीया
Washim आरटीई (राइट टू एज्युकेशन) अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक सत्रात मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी गतवर्षाच्या तुलनेत जिल्ह्यातील शाळांची संख्या सातने कमी झाली असली तरी प्रवेशित जागांची संख्या ५८ ने वाढली आहे. अर्ज प्रक्रियेला १४ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पालकांची लगबगदेखील वाढलेली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये एकूण प्रवेशाच्या २५ टक्के जागा मोफत प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात येतात. दरवर्षी जानेवारी महिन्यात आरटीईअंतर्गत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होत असते. यंदाही ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत आरटीईअंतर्गत शाळांची नोंदणी प्रक्रिया राबविण्यात आली. गतवर्षी १०९ शाळांनी नोंदणी केली होती. या शाळांमध्ये ९५३ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव होत्या. यंदा १०० शाळांची नोंदणी झाली आहे.
CM Devendra Fadnavis 100 days program : जिल्हा परिषदेचे अधिकारी एसीतून बाहेर निघाले
या शाळांमध्ये १०११ जागा मोफत प्रवेशासाठी राखीव आहेत. शाळांच्या संख्येत घट झाली असली तरी मोफत प्रवेशाच्या जागा ५८ ने वाढल्या आहेत. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त विद्यार्थ्यांना मोफत प्रवेशाची लाॅटरी लागणार आहे.
गेल्यावर्षी झाला हाेता विलंब
गतवर्षी प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मोफत प्रवेश प्रक्रिया फारच विलंबाने अर्थात जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू झाली होती. त्यामुळे गतवर्षी मोफत प्रवेशाच्या २२४ जागा रिक्त राहिल्या. यावर्षी लवकरच प्रक्रीया सुरू झाल्याने सर्वच जागा भरल्या जाण्याची शक्यता आहे. शाळांची नाेंदणीही वेळेवर सुरू झाली आहे.
Salon and Beauty Parlor Association : नट्टा-थट्टा महागणार? दरवाढ होण्याची शक्यता!
ही कागदपत्रे लागणार
रहिवासी पुरावा, मागास प्रवर्ग असेल तर जातीचे प्रमाणपत्र, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, जन्म दाखला, ओळखीचा पुरावा, आधार कार्ड.
तालुकानिहाय शाळा
तालुका / शाळा
कारंजा १५
मालेगाव १५
मं.पीर १८
मानोरा ०८
रिसोड १४
वाशिम ३०