Right to vote in jeopardy due to BJP : मतदारांची माहिती लपवणे गंभीर बाब
Buldhana ‘देशातील लोकशाही आणि संविधान आज धोक्यात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा हक्क भाजप आणि निवडणूक आयोगाने धोक्यात आणला आहे,’ अशी टीका जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी केली. जिल्हा काँग्रेस मुख्यालयात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
बोंद्रे यांनी मतदारांची माहिती लपवण्याच्या गंभीर प्रकरणावर प्रकाश टाकला. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व पातळ्यांवर घोटाळा झाला. मतदार याद्या, मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गडबडीमुळे लोकशाही मूल्यांना तडा गेला आहे. निवडणूक आयोगाने मतदार याद्यांसंबंधी सर्व डेटा डिलीट केला आहे. हे अतिशय गंभीर आणि लोकशाहीसाठी घातक आहे, असेही ते म्हणाले.
राहुल बोंद्रे म्हणाले, देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम सुरु आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला. पण या अधिकारावरच भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने दरोडा टाकत आहे. नुकत्याच पार पडललेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सर्व पातळ्यांवर घोटाळे करण्यात आले. मतदार याद्या, मतदान व मतमोजणीत घोळ करून भाजपला सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मदतच केली आहे.
काँग्रसने या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला असून निवडणूक आयोगाकडे मतदारयाद्या व वाढलेल्या मतदानाची सर्व माहिती मागितली पण निवडणूक आयोग माहितीच देत नाही. निवडणूक आयोगने आता सर्व डेटा डिलीट करून टाकला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर व लोकशाहीसाठी घातक आहे असे बोंद्रे म्हणाले.
MLA Nitin Deshmukh : श्रेय लाटण्याचा काही लोकप्रतिनिधींचा डाव
कार्यक्रमाला आमदार धीरजभाऊ लिंगाडे, प्रदेश उपाध्यक्ष विजय अंभोरे, उपसभापती आशाताई शिंदे, तसेच काँग्रेसच्या विविध नेत्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुनिल सपकाळ यांनी केले.