River cleaning : मिठी नदीत बुडाले आदित्य ठाकरे !

Shiv Sena leader Sanjay Nirupam makes serious allegations against Aditya Thackeray : डिनो मोरिया व आदित्य ठाकरे यांची घनिष्ठ मैत्री

Mumbai : मिठी नदीच्या सफाईसाठी गेल्या २० वर्षांत १२०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरीही ही नदी आजही पूर्णपणे स्वच्छ झालेली नाही. यामध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप शिवसेनेचे उपनेते आणि प्रवक्ते संजय निरूपम यांनी केला आहे. या प्रकरणात अभिनेता डिनो मोरिया याची चौकशी सुरू आहे आणि डिनो मोरिया व आदित्य ठाकरे यांची घनिष्ठ मैत्री आहे. मिठी नदीच्या भ्रष्टाचारात आदित्य ठाकरेही बुडालेले आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही निरूपम यांनी केली आहे.

काल (ता. २९) मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत निरुपम म्हणाले, मिठी नदी आणि नाले सफाईच्या कामांत तब्बल ६५ कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात पालिकेचे तीन अधिकारी, पाच कंत्राटदार, तीन दलाल व दोन कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत चौकशी सुरू आहे. २००५ ते २०२२ दरम्यान मुंबई महापालिकेत उपाठा गटाचे वर्चस्व होते आणि त्या काळात मातोश्रीच्या परवानगीशिवाय कोणालाही कंत्राट मिळत नसे, हे सर्वश्रुत आहे.

NCP Sharad Pawar : २५ वर्षे शरद पवारांसाठी कामे केले, आता अचानक काय झाले?

डिनो मोरियावर आरोप करताना निरूपम म्हणाले की, तो फक्त या प्रकरणात सहभागी नाही, तर मुंबईतील ड्रग्ज रॅकेटमध्येही त्याचे नाव चर्चेत आहे. तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणात तिचे वडील सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि डिनो मोरियावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे या दोघांची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.

२००५ च्या अतिवृष्टीची आठवण करून देत निरूपम यांनी ठाकरे कुटुंबावर निशाणा साधला. २६ जुलै २००५ रोजी मुंबईला मोठा पूर आला होता. मात्र त्यावेळी ठाकरे कुटुंब रस्त्यावर दिसले नाही. बाळासाहेब मातोश्रीवर होते आणि उद्धव ठाकरे कुटुंबासह ताज हॉटेलमध्ये गेले होते. त्याच्या उलट सोमवारी झालेल्या अतिवृष्टीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ रस्त्यावर उतरून परिस्थितीचा आढावा घेतला. आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आणि मुंबईकरांच्या मदतीसाठी सज्ज झाले, असे निरूपम म्हणाले.

Nagpur Municipal Corporation : लोकांचे अतिक्रमण काढणाऱ्या मनपानेच केले अतिक्रमण!

ऑपरेशन सिंदूर संदर्भात बोलणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावरही संजय निरूपम यांनी टीका केली. राऊत पाकिस्तानची सुपारी घेऊन बोलत आहे का? जगभर भारतीय खासदार ऑपरेशन सिंदूरची गौरवगाथा सांगत आहेत. असे असताना राऊत मात्र पाकिस्तानची भाषा बोलत आहेत, असेही निरूपम म्हणाले.