Jewels worth two and a half lakhs were stolen : तीन आरोपींचे कृत्य; एकाने राऊंड फायर केला
Gondia गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जुनेवानी ते मंगेझरी रोडवरील जंगल परिसरात बंदुकीच्या धाकावर एका व्यापाऱ्याला लुटले. व्यापाऱ्याकडील २ लाख २४ हजार रुपये लुटल्याची घटनेने चांगलीच खळबळ उडाली. आरोपींनी हवेत एक राऊंड फायर केल्यामुळे त्यांच्या मनात धडक भरली. यासंदर्भात तिन्ही अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिरोडा येथील सुभाष वॉर्डातील गौरव सेवकराम निनावे (३३) हे मित्र दृश्यंत रेबे यांचा पुतण्या राम रेबे यांच्या लग्नाच्या स्वागत समारोहाकरिता मंगळवारी (दि. २१) रात्री ९ वाजता आकाश नंदरधने यांच्यासोबत चारचाकी वाहनाने (एमएच ३५-एजी १८३६) गेले होते. यानंतर ते स्वागत समारंभ आटोपून घरी परतत असताना रात्री ११:३० वाजताच्या सुमारास गाडी जुनेवानी गावाकडे निघाले होते. जुनेवानी गावापासून काही अंतरावर पुढे गेल्यावर १ किमी अंतरावर निनावे यांच्या कारच्या पुढे पल्सर मोटारसायकलवर ३ जण आले. त्यांनी मोटारसायकल थांबवून कारला थांबविले.
Local body elections: नागपुरातून येणाऱ्या लिफाफ्यात कुणाचे नाव?
तिघेही मंकी कॅप घालून त्यावर स्कार्फ गुंडाळून होते. यानंतर त्या तिघांनी त्यांच्याजवळ असलेली पिस्तूल काढून निनावे व आकाशच्या कानाजवळ लावली. तुमच्याजवळ जे सामान आहे तो काढून देण्यास सांगितले. ते दोघेही घाबरल्याने थोडा वेळ गप्प राहिले. यात त्यांनी त्या दोघांच्या जवळून २ लाख २४ हजार ५०० रुपयांचा माल हिसकावून नेला. यानंतर घटना स्थळावरून पसार झाले.
गौरव निनावे यांच्या तक्रारीवरून आरोपींवर गंगाझरी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (४), ३ (५), ३५१ (२), सहकलम ३, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा करीत आहेत.
आकाशच्या बाजूला असलेल्या तरुणाने आकाशच्या हातात एक बंदुकीचा गोळी देऊन तुम्हाला गम्मत वाटते काय, असे म्हणत त्याने बंदुकीतून एक राऊंड हवेत फायर केला आणि दागिने लुटून पसार झाले.
निनावे यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची साखळी (किंमत १ लाख २० हजार), दोन सोन्याचा अंगठ्या (६ ग्रॅम व ८ ग्रॅम, किंमत ६० हजार), हातातील चांदीचे कडे (किंमत ६ हजार ५०० रुपये), पर्समधील १८ हजार रुपये, असा एकूण २ लाख ४ हजार ५०० व आधार कार्ड व मोदी जॅकेट जबरीने हिसकावून घेतले. आकाशची सोन्याची अंगठी (४ ग्रॅम, किंमत २० हजार रुपये) जबरीने हिसकावली.
निनावे यांचे आधार कार्ड घेऊन गेले. आधार कार्ड कशाला नेता, असे विचारले असता, तुम्ही पोलिसांकडे गेले तर तुम्हाला तुमच्या घरी येऊन ठोकून काढू, अशी धमकी दिली.








