Breaking

Fake appointment letters Scam : नोकरीच्या नावावर लुबाडणाऱ्या टोळ्या सक्रीय

Robbery gangs active in Nagpur offering fake jobs Fake appointment letters are being distributed for lakhs of rupees लाखो रुपये घेऊन वाटतात बनावट नियुक्तपत्रे

Nagpur शहरात शासकीय नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून १० ते २० लाख रुपयांनी लुबाडणाऱ्या अनेक टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. एका उच्चशिक्षित बेरोजगार युवकाला नोकरी लावून देण्याच्या नावाने एका टोळीने १ लाख ८३ हजार रुपये उकळले. ही ताजी घटना आहे. त्याला एका शासकीय कार्यालयात नोकरी लागल्याबाबत नियुक्तीपत्रसुद्धा दिले. तो युवक नियुक्तीसाठी शासकीय कार्यालयात गेला असता तेथील अधिकाऱ्यांनी त्याला हाकलून दिले. त्यामुळे बनावट नियुक्तीपत्र देणाऱ्या टोळीचे बींग फुटले.

युवकाच्या तक्रारीवरुन मानकापूर पोलिसांनी टोळीच्या म्होरक्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. रजत गुप्ता (४०) रा. गोधनी असे आरोपीचे नाव आहे. रजत हा कोराडी औष्णिक केंद्रात कंत्राटी पध्दतीवर सुरक्षारक्षक म्हणून कामाला होता. तो नेहमीच मानकापूर ठाण्याअंतर्गत फरस परिसरातील एका पानटपरीवर थांबत होता. त्याच ठिकाणी फिर्यादी निलकचंद तांडेकर (५०) रा. मानकापूर यांचा मुलगासुध्दा जायचा. त्यामुळे आरोपी रजत सोबत त्याची ओळख होती.

Nagpur Zilla Parishad : फक्त व्याजातून मिळाले सव्वासात कोटी!

फिर्यादीचा मुलगा कामाच्या शोधात असल्याची माहिती आरोपीला मिळाली. त्याने कोराडी औष्णिक केंद्रात सुरक्षा अधिकारी असल्याची त्याने बतावणी केली. तसेच ‘या ठिकाणी सुरक्षारक्षक पदासाठी भरती होत आहे. तुला नोकरीवर लागायचे असेल तर काही खर्च करावे लागेल,’ असे सांगितले. पीडित युवक त्याच्या जाळ्यात अडकला. त्याने वडिलांना सांगितले.

निलकचंद हे समोसे विकतात. त्यांच्या मुलाने बीसीएचे शिक्षण घेतले. सध्या नोकरी नसल्याने तो वडिलांच्या कामात मदत करतो. मुलाला नोकरी मिळत असल्याने वडिलही आनंदी होते. रजतने रिझर्व्ह बँकेत चालान भरायचे आहे, अशी थाप मारून वेळोवेळी पीडित कुटुंबाकडून एक लाख ८३ हजार रुपये घेतले.

Nagpur RTO : चारशे रुपयांची लाच घेताना आरटीओ अधिकाऱ्याला अटक !

पीडित युवक त्याला नोकरी संदर्भात विचारणा करायचा. आरोपी रजत दरवेळी नवीन माहिती सांगून वेळ मारून नेत होता. आठ महिने लोटल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने पीडित युवकाने तगादा लावला. त्यामुळे रजतने त्याला बनावट नियुक्तीपत्र दिले. आनंदात असलेला युवक नियुक्तीपत्र घेऊन औष्णिक वीज केंद्रात गेला.

संबधीताने ते पत्र पाहिले. ‘आमच्या कार्यालयाचे हे पत्र नाही,’ असे म्हणताच पीडित युवकाच्या पायाखालची जमीनच सरकली. फिर्यादीच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी आरोपी विरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.