NCP MLA visits family of farmer suicide victim : चिमुरडीचा सरकारला थेट सवाल; शेतकऱ्यांच्या वेदनांना शब्दांत मांडले
Chikhali “तेलाचा भाव ११५ रुपये लिटर, पण माझ्या बापाच्या सोयाबीनला फक्त ३-४ हजार रुपये दर!” — ही वेदना आहे सीमा थुट्टे या आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सीमाने आमदार रोहित पवार यांच्यासमोर डोळ्यांत अश्रू आणणारे प्रश्न उपस्थित करत सरकारच्या धोरणांवर तिखट शब्दांत प्रहार केला.
“आम्हाला १५०० रुपये नको, पण आमच्या मालाला योग्य भाव द्या!” – या तिच्या शब्दांनी उपस्थितांचे मन हेलावून टाकले. वाढता उत्पादन खर्च, न मिळणारा बाजारभाव, कर्जाचा बोजा आणि आत्महत्यांचे दाहक वास्तव सीमाच्या थेट भाषेतून व्यक्त झाले.
Hybrid annuity scheme : २०० कोटींच्या रस्त्याच्या गुणवत्तेवर माजी राज्यमंत्र्यांचा सवाल
शेतकऱ्यांचा मुलगा असो वा मुलगी – त्यांच्यावरही घरातील हालअपेष्टा आणि शेतीच्या समस्यांचा परिणाम होतो, हे सीमाच्या भाषणाने पुन्हा अधोरेखित झाले. “कधी घरात तेल असतं पण मीठ नसतं, वहीसाठीही खिशात पैसे नसतात” – असे ती म्हणाली. आमदार रोहित पवार यांनी आत्महत्याग्रस्त कुटुंबाचे सांत्वन केले. पण सीमाने उपस्थित केलेला प्रश्न सरकारला आरसा दाखवणारा ठरला. केवळ आश्वासने नव्हे, तर वास्तवात बदल करणारे धोरणच शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आणू शकते.
मस्साजोगमध्ये (ता. केज) स्व. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी त्यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी, कुटुंबातील इतर सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. संपूर्ण राज्याला हादरवणारी ही घटना असून या धक्क्यातून अजूनही देशमुख कुटुंब बाहेर आलेलं नाही. कु. वैभवी ही तर या प्रसंगाला मोठ्या धैर्याने सामोरी जात शिक्षण घेत आहे. यावेळी तिच्याशी, देशमुख कुटुंबियांशी आणि ग्रामस्थांशी चर्चा करुन प्रकरणाचीही माहिती घेतली आणि त्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या, अशी भावना रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत.