Ramdas Athawales displeasure; Demand made to the Prime Minister : रामदास आठवलेंची नाराजी; पंतप्रधानांकडे केली मागणी
Mumbai : महायुतीतील महत्त्वाचा घटक असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महायुतीतील नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत आपल्या पक्षाला महत्त्वाची जबाबदारी मिळावी, यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.
आठवले यांनी दिल्ली येथे पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली असून, त्यात महायुतीतील नाराजीचाही मुद्दा मांडण्यात आल्याचे आठवले यांनी सोशल मीडियावर सांगितले. त्यांनी पंतप्रधानांसोबतचे फोटो शेअर करत दुसऱ्या दिवशी, हा विषय पुन्हा उपस्थित केला.
Janakpurush Aandolan : महाराष्ट्रात ठाकरे गटाचे जनआक्रोश आंदोलन
“आम्ही महायुतीचे जुने आणि विश्वासू घटक आहोत. महाराष्ट्रातील आरपीआय कार्यकर्त्यांनी स्थापनेपासूनच प्रत्येक आघाड्यावर कठोर परिश्रम केले आहेत. त्यामुळे राज्यातील सरकारमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा समावेश करावा, जेणेकरून आंबेडकरी विचारसरणीचे प्रतिनिधित्व होईल,” असे आठवले यांनी सांगितले.
आठवले यांनी स्पष्ट केले की, “आम्हाला महाराष्ट्रात मंत्रिपद अपेक्षित होतं, पण भाजपाने ते दिलं नाही. केवळ मंत्रिपदच नाही, तर सत्तेत कोणतीही महत्त्वाची भूमिका आमच्या पक्षाला मिळालेली नाही. याबाबत मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली आहे.”
आगामी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये समाधानकारक जागा मिळाव्यात, अशी आठवले यांची मागणी आहे. तसेच राज्यात किमान दोन महामंडळांची अध्यक्षपदे आणि 60 ते 70 महामंडळांमध्ये सदस्यत्व देण्याचीही त्यांनी पंतप्रधानांकडे मागणी केली आहे. महायुतीतील या नाराजीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आघाडीसमोर नवा राजकीय समीकरणांचा प्रश्न निर्माण झाला आहे.