Treat the RPI Athawale party with respect : पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडे मागणी
Buldhana बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाच्या वतीने अलीकडेच पालकमंत्री मकरंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, सत्कार सोहळ्यात रिपाईच्या नेत्यांनी आपली मागणीही मांडली. महायुती सरकारमध्ये Mahayuti Government रिपाई आठवले गटाला सन्मानाची वागणूक द्यावी, अशी अपेक्षा यावेळी मंत्र्यांकडे व्यक्त करण्यात आली.
बुलडाणा जिल्हा रिपाईचे जिल्हासंपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब यांच्या नेतृत्वात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. रिपाईच्या शिष्टमंडळाने नामदार पालक मंत्र्यांसोबत चर्चा केली. रिपाई आठवले गट महाराष्ट्राच्या महायुती सरकार सोबत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील ज्या ज्या शासकीय कमेट्या असतील त्यात मित्र पक्ष या नात्याने आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा सामावेश करावा, अशी विनंती करण्यात आली.
Archaeological Department : भोन येथील बौद्ध स्तुपाच्या संवर्धन कार्याला गती
शासकीय समित्यांवर कार्यकर्त्यांना संधी दिल्यास उत्साह वाढेल. तसेच महायुतीची पाळंमुळे शहरात घट्ट होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आम्ही आपल्या महायुतीत रामदास आठवले यांच्या आदेशाने तूमच्यासोबत आहोत. फक्त आम्हाला मित्र पक्ष या नात्याने महायुती सरकारमध्ये सन्मानाची वागणूक द्यावी, असे पदाधिकारी म्हणाले. यावेळी जिल्ह्यातील विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
Vidarbha Farmers : कापूस खरेदीसाठी शेतकऱ्यांचे रास्ता रोको !
यावेळी घाटावरिल रिपाई जिल्हाध्यक्ष इंजिनियर खरात, घाटाखालील जिल्हध्यक्ष भाऊसाहेब सरदार, जिल्हाउपाध्यक्ष इंजिनियर राजेश सरकटे, अल्पसंख्यचे जिल्हध्यक्ष नबाब मिर्झा, रिपाई जेष्ठनेते मुरलीधर गवई, युवाजिल्हाध्यक्ष विजय साबळे, बुलडाणा तालुखाध्यक्ष केशव सरकटे, मोताळा तालुखाध्यक्ष बाळासाहेब आहिरे, विदर्भ महीलाउपाध्यक्ष आशाताई वानखडे, जिल्हा नेते विजयराव सपकाळ, चिखली हिम्मतराव जाधव, सिंदखेडराजा रमेश पिंपळे, देऊळगाव राजा प्रदिप मुखदयाल, जळगांव जामोद संतोषराव वानखडे, खामगाव निळकंठ सोनुने आदींची उपस्थिती होती.