RSS Utsav : आपण एकटे जगू शकत नाही, पण निर्भरता नाईलाज होऊ नये !

RSS chief Mohan Bhagwat’s remarks at Vijayadashami gathering : विजयादशमी मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवतांचे भाष्य

Nagpur : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी विजयादशमी मेळावा आज नागपूरच्या रेशमबाग मैदानात मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी २१ हजारांहून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून हजेरी लावली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले आणि आत्मनिर्भरतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाची सुरुवात संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. सरसंघचालक मोहन भागवत आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शस्त्रपूजन करून परंपरेचे पालन केले. यावेळी विविध देशांतील विदेशी पाहुण्यांनीही हजेरी लावली.

Padalkar Vs Patil : तर जयंत पाटील जुनियर,आम्हाला हलक्यात घेऊ नका !

आपल्या भाषणात भागवत म्हणाले की, “काही महिन्यांपूर्वी पहलगामसारखी दुर्घटना घडली. धर्म विचारून निष्पाप लोकांची हत्या झाली. पण सरकार आणि सेनेने ठामपणे उत्तर देऊन दृढ नेतृत्व दाखवले.”

अमेरिकेच्या नवीन टॅरिफ धोरणावर भाष्य करताना भागवत म्हणाले, “अमेरिकेने लागू केलेल्या या धोरणाचा फटका सर्वांनाच बसत आहे. त्यामुळे जगात परस्पर संबंध मजबूत करणे आवश्यक आहे, कारण आपण एकटे जगू शकत नाही. पण ही निर्भरता नाईलाज होऊ नये. आत्मनिर्भर होऊन स्वतःच्या पायावर उभे राहणे आवश्यक आहे.”

यावेळी त्यांनी गुरू तेग बहादूर यांच्या बलिदान वर्षाचे स्मरण केले आणि महात्मा गांधींच्या योगदानावर भाष्य केले. “देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात आणि त्यानंतरची व्यवस्था घडवण्यात गांधीजींचे योगदान अमूल्य आहे,” असे ते म्हणाले.

Sambhaji Bhide : पाकिस्तानला संपवल्याशिवाय जग नीट चालणार नाही!

या विजयादशमी सोहळ्यातील भागवतांचे भाषण सध्या राजकीय वर्तुळात आणि सामाजिक स्तरावर चर्चेचा विषय ठरत आहे.