RTO Department : HSRP साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ; त्यानंतर नो एक्स्टेन्शन, थेट दंड !

HSRP deadline extended till December 31; no extension thereafter, direct penalty : नागपुरात २२ लाखांपैकी फक्त ५.९७ लाख वाहनधारकांनीच बसवली HSRP; तपासणी वायुवेग पथकाकडे

Nagpur : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी अशी की, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसवण्याची अंतिम मुदत राज्य सरकारने पुन्हा एकदा वाढवली आहे. आता ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांसाठी या प्लेट्स बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक वाहनधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्याने सरकारला सलग सहावी वेळ मुदतवाढ देण्याची वेळ आली.

HSRP लागू करण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून सुरू झाली. सुरुवातीला ३१ मार्च ही अंतिम तारीख दिली होती. त्यानंतर ३० एप्रिल, ३० जून, १५ ऑगस्ट आणि अलीकडेच ३० नोव्हेंबर अशी मुदतवाढ देण्यात आली. इतक्या वेळा संधी दिल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवली नसल्याचे परिवहन विभागाला आढळले. त्यामुळे आणखी एकदा मुदत वाढवून ३१ डिसेंबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे.

Winter Session of Parliament : हिवाळी अधिवेशनाआधी ‘वर्गणी’चा खेळ ?

नागपूर जिल्ह्यात चिंताजनक चित्र..
नागपूर जिल्ह्यात एकूण २२,३४,९१२ जुन्या वाहनधारकांपैकी केवळ ५,९७,२१३ वाहनांना HSRP बसवण्यात आली आहे. म्हणजेच तब्बल १६,३७,६९९ वाहनधारकांनी अद्यापही हा नियम पाळलेला नाही. विभागाच्या मते, ही मोठी तफावत लक्षात घेता वाहनधारकांना दिलासा देण्याच्या उद्देशानेच ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

Local Body Elections : प्रचाराला अवघे काही तास शिल्लक, महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत होणार थरारक सामना !

यापुढे मुदत नाही..
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. ३१ डिसेंबर २०२५ नंतर HSRP नसलेल्या वाहनचालकांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाईल. ही तपासणी विशेष वायुवेग पथकामार्फत होणार असल्याची माहिती परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. वाहनचालकांनी या काळात HSRP बसवून कारवाईपासून दूर राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. सरकारकडून मिळालेली ही अंतिम संधी मानून मोठ्या संख्येने वाहनधारक पुढील काही आठवड्यांत RTO कार्यालयांत धाव घेतील, अशी अपेक्षा आहे.