Breaking

Rural student games : आता विभागीय आणि राज्यस्तरावर खेळतील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी !

 

Now Zilla Parishad students will play at the divisional and state level sports : शासन निर्णयानुसार क्रीडा समिती गठीत

Nagpur : जिल्हा परिषदेमार्फत केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. पण जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना विभागीय आणि राज्य पातळीवर आपल्या खेळाची चमक दाखवण्याची संधी मिळत नाही. यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षक मनीष डफ्फर यांच्यासह काही शिक्षकांनी पुढाकार घेतला. त्यांच्या प्रयत्नांना आता यश येताना दिसते आहे.

नागपूर जिल्हा परिषदेतील शिक्षक मनीष डफ्फर, गिरीश उईके, सुरेश ठोंबरे, विनोद वानखेडे, हेमंत साळुंके यांनी जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थी विभागीय आणि राज्यस्तरावर चमकावे यासाठी पुढाकार घेतला. कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष निलेश हेलोंडे यांच्याकडे त्यांनी हा विषय मांडला. तसे निवेदनही त्यांना दिले.

Caste-wise censuses : जनतेचे लक्ष भरकटवण्यासाठी मोदी सरकारचा पुन्हा एक डाव !

अॅड. निलेश हेलोंडे यांनी यासंदर्भात राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र देऊन शिक्षकांच्या मागणीवर कार्यवाही करण्याची विनंती केली. त्यावर मंत्री भरणे यांनी तात्काळ कार्यवाही केली. त्यानंतर शासनाच्या संकीर्ण २०२५/प्र. क्र. १२६/आस्था – ७ दिनांक ११ एप्रिल २०२५ नुसार जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा विभागीय आणि राज्यस्तरावर सुरू करण्यासाठी तपासणी व अभ्यास करुन अहवाल सादर करण्यासाठीक्रीडा समिती गठीत करण्यात आली आहे.

Maharashtra Day : आपल्याच घरात मराठी हाल सोसतेय, जयंत पाटलांचं भावनिक पत्र !

आता लवकरच जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी विभागीय आणि राज्यस्तरावर खेळताना दिसतील, असा विश्वास मनीष डफ्फर यांच्यासह शिक्षकांनी व्यक्त केला. ग्रामीण भागामधील विद्यार्थ्यांमध्ये कला, क्रीडा गुण ठासून भरले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी रांगडे असतात. मैदानी खेळात त्यांचे कसब पाहण्याजोगे असते. आमच्या नोकरीच्या काळात आम्ही हे दरवर्षी बघतो. त्यामुळे या विद्यार्थ्य़ांनाही राज्यस्तरावर खेळण्याची संधी मिळावी, या उद्देशाने आम्ही प्रयत्न केले. आता प्रयत्नांना यश मिळताना दिसते आहे. लवकरच जिल्हा परिषद विद्यार्थ्यांच्या विभागीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू होतील, असे शिक्षकांनी ‘सत्तावेध’ला सांगितले.