Sachin Pilot : इंडिया आघाडी दिल्लीत अस्तित्वात नाही का?

India Aghadi Does not exist in Delhi? : प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते; पायलट यांचा दावा

Mumbai माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट यांनी शुक्रवारी, दि. ९ जानेवारीला मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. करांच्या संदर्भात विविध मागण्या करताना देशातील वाढत्या बेरोजगारीवर त्यांनी भाष्य केले. त्याचवेळी इंडिया आघाडी मजबूत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. पण दिल्ली विधानसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेस आमनेसामने आहेत. त्यामुळे दिल्लीत इंडिया आघाडी अस्तित्वात नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो.

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीमध्ये फारसा रस दाखविलेला नाही. दुसरीकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे तळ्यात मळ्यात सुरू आहे. इंडिया आघाडीबद्दल दक्षिणेत फारसा उत्साह बघायला मिळत नाही. अशात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन पायलट यांनी इंडिया आघाडी मजबूत असल्याचे विधान केले आहे. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Ashish Deshmukh : वहीनी 26 हजार मतांनी पडल्या, पण साहेब दुप्पट मतांनी पडले असते !

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विधानसभेसाठी मतदान होईल. याठिकाणी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीचे वर्चस्व आहे. भाजपच्या काही जागा तरी याठिकाणी निवडून येतात. काँग्रेसला मात्र बोटावर मोजण्याएवढ्या जागांवर समाधान मानावे लागते. अशात इंडिया आघाडीमध्ये असलेल्या केजरीवालांसाठी काँग्रेस एक पाऊल मागे घेईल का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांचे विधान नवे संकेत देत आहेत.

लोकशाही, संविधान व देशहित लक्षात घेऊन काँग्रेससह अनेक पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली. ही आघाडी आजही मजबूत आहे. प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते. त्यानुसार काही निर्णय घ्यावे लागतात. याचा अर्थ इंडिया आघाडी कमजोर झाली, असे म्हणता येणार नाही असे पायलट यांनी स्पष्ट केले.

Sachin Pilot on Narendra Modi : भाजपचा देशात ‘टॅक्स टेररिझम’!

काँग्रेस दिल्ली कशी सोडणार?
सचिन पायलट यांनी प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगळी असते असं म्हटलं आहे. इंडिया आघाडीत एकत्र असलेले आप आणि काँग्रेस दिल्लीत वेगळे लढण्याचे त्यांनी समर्थनच केले आहे. काँग्रेसचे राजकारण अनेक वर्षे दिल्लीतूनच होत आले. अशात आपसाठी दिल्ली सोडण्यासाठी काँग्रेसही तयार होऊ शकत नाही, हे स्पष्ट आहे.