Breaking

Saffron hoisted on Kedarkantha peak : १२५०० फुट उंचावर पोहोचली ९ वर्षांची चिमुकली

 

A 9-year-old Buldhana girl reached a height of 12500 feet : केदारकंठा शिखरावर फडकवला भगवा

Buldhana इच्छा आणि जिद्द असेल तर लक्ष्य प्राप्त करायला वयाची मर्यादा येत नाही. बुलढाण्यातील नऊ वर्षाच्या सिद्धीने हे खऱ्या अर्थाने सिद्ध करून दाखवले आहे. अगदी अंगणात बागडण्याच्या वयात तिने १२ हजार ५०० फुटांवर भगवा फडकवला आहे. तिचे आता जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून कौतुक होत आहे. सोशल मीडियावर तिच्यावर कौतुकाचा पाऊस पडत आहे.

नऊ वर्षांची सिद्धी विठ्ठल सोनू (रा. साखळी बु.) हिने उत्तराखंडातील १२,५०० फूट उंच असलेल्या केदारकंठा शिखरावर तिरंगा आणि छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज अभिमानाने फडकवला. गणतंत्र दिनाच्या ऐतिहासिक दिवशी, सिद्धीने हा अद्वितीय पराक्रम गाजवत बुलढाणा जिल्ह्याच्या शौर्याची नव्या पिढीकडून ओळख निर्माण केली आहे.

Mahayuti Government : नातेवाईक त्रास देतात, इच्छापत्राचे काय करू?

शिखर सर करण्याचा रोमांचक प्रवास
केदारकंठा हिमालय पर्वतरांगांमध्ये असून, हा पाच दिवसांचा अत्यंत कठीण ट्रेक मानला जातो. येथील संपूर्ण परिसर बर्फाच्छादित असून तापमान उणे अंशात असते. चढाईसाठी साखरे गावातून सुरुवात होते, आणि उंचसखल, निसरड्या बर्फाच्छादित वाटांमधून मार्गक्रमण करावे लागते.

या कठीण परिस्थितीतही सिद्धीने अपार साहस, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिखर सर केले. २६ जानेवारी रोजी पहाटे ३.४५ वाजता सिद्धीने अंतिम चढाईला सुरुवात केली आणि सकाळी ६.१५ वाजता तिने शिखर गाठले. सकाळी ६:४५ वाजता तिने तिरंगा आणि छत्रपती शिवरायांचा भगवा ध्वज अभिमानाने फडकवला.

Ladki Bahin Scheme : नियम कठोर झाले, पण बहिणी आत्मनिर्भर झाल्या!

सिद्धीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, प्रशिक्षक उषा पांडव मॅडम, जैन सर, शिवशंकर गोरे आणि डॉ. शिवाजी देशमुख यांना दिले आहे. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीने बुलढाणा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले असून, तिच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे. सिद्धीच्या या अचाट पराक्रमामुळे ती महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची गिर्यारोहकांपैकी एक बनली आहे.