Nana Patole blamed CM Devendra Fadnavis for attack : पटोले म्हणतात, ‘राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे’
Mumbai चित्रपट अभिनेता पद्मश्री सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्यावरून आता राजकीय सिनेमा रंगालया लागला आहे. सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एक उत्तम संधी विरोधकांना मिळाली आहे. सैफ याच्यावर त्याच्या राहत्या घरी झालेल्या हल्ल्यासाठी मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात असल्याचे म्हटले आहे.
सैफ यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील. तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. भाजपा युती सरकारमध्ये गुंडाराज फोफावले असून सैफ अली खान वरील हल्ला हे गुंडांनी महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था दिलेले आव्हान आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Pankaja Munde On DCM Ajit Pawar : अजितदादांचं काम बघून भारावल्या पंकजाताई !
महायुती सरकारच्या काळात गुंडाराज फोफावले असून हे सरकारचे अपयश आहे, असं पटोले यांनी म्हटलं आहे. राज्यातील कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर त्यांनी महायुती सरकारचा समाचार घेतला. ‘भाजपा सरकारमध्ये गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांच्या लाडक्या पोलीस महासंचालक अत्यंत निष्क्रीय आहेत. मुंबईला दोन पोलीस आयुक्त आहेत तरीही ना राज्यात कायदा सुव्यवस्था आहे ना मुंबईत.’
Governor C.P. Radhakrishnan : विद्यापीठातून शिकवला जावा ‘पर्यावरण संवर्धन!
फडणवीस अपयशी
बीडमधील संघटीत गुन्हेगारी व त्याला असलेले राजकीय आशिर्वाद. परभणीत पोलीस कोठडीत मृत्यू. वांद्र्यात माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या. अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार. या गंभीर घटना आहेत. गृहमंत्री पद सांभाळण्यात फडणवीस अपयशी ठरले आहेत. राज्यात सोलिब्रिटी, सत्ताधारी पक्षाचे नेते, सर्वसामान्य जनता कोणीही सुरक्षित नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी हिंमत दाखवावी
गुन्हेगारांना सोडणार नाही, कठोर शिक्षा करू अशा विधानांचे पालुपद ते सोडतात. मग काहीतरी कठोर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांनी दाखवावी. राज्यात गुन्हेगारी वाढत असताना फडणवीस गंभीर नसल्याचे दिसत आहे. अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याची गंभीर दखल घेण्याऐवजी मुख्यमंत्री फडणवीस चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होते. असे निष्क्रीय व कमजोर गृहमंत्री महाराष्ट्राला लाभले हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, या शब्दांत त्यांनी टीका केली.