MLA angers on contractors and officials : घाणीचे साम्राज्य, स्वच्छता निरीक्षकाला सुनावले खडे बोल
Akola पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघातील सोनटक्के प्लॉट परिसरात आमदार साजिद खान पठाण यांनी आकस्मिक दौरा केला. या पाहणीत परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य आढळताच त्यांनी संताप व्यक्त करत तत्काळ मनपा स्वच्छता विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदारांना बोलावून चांगलेच खडेबोल सुनावले.
या निमित्ताने पडीक वॉर्डात कंत्राटदार, स्वच्छता निरीक्षक आणि मनपा अधिकाऱ्यांची कचऱ्याच्या दुर्गंधीतून उघडकीस आलेली भ्रष्ट मिलीभगत पुन्हा एकदा चर्चेत आली.
साजिद पठाण यांची आमदारकीपूर्वी आक्रमक नगरसेवक म्हणून ओळख होती. नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या त्यांच्या शैलीमुळे ते प्रसिद्ध होते. मात्र, आमदार झाल्यानंतर ते सौम्य झाले, अशी चर्चा सुरू होती. अखेर तब्बल दहा महिन्यांच्या शांततेनंतर पठाण यांनी शुक्रवारी पुन्हा जुन्या शैलीत आक्रमकतेची झलक दाखवली.
Marbat 2025 : महागाई, भ्रष्टाचारावर प्रहार; डोनाल्ड ट्रम्पचाही बडगा !
पाहणीदरम्यान ठिकठिकाणी साचलेला कचऱ्याचा ढीग आणि तुडुंब भरलेल्या नाल्या पाहून आमदारांचा पारा चढला. विचारणा केली असता नागरिकांनी तक्रार केली की, घंटागाडी आठ दिवसांत फक्त एकदाच येते. शिवाय या वॉर्डात फक्त चारच सफाई कर्मचारी थातूरमातूर सफाई करून निघून जातात.
India Pak Cricket : भारत पाक क्रिकेट म्हणजे सट्टेबाजीचा बाजार !
यावर आ. पठाण यांनी तात्काळ स्वच्छता निरीक्षक आणि ठेकेदारांना बोलावून सुनावणी घेतली. ‘‘या पडीक वॉर्डात मंजूर असलेले सर्व सफाई कर्मचारी तातडीने लावा, अन्यथा ठेकेदार बदलून नवा ठेकेदार नेमा,’’ असा सज्जड दम त्यांनी दिला. तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही पाचारण करून रस्त्यावरील लोमकळलेल्या वायर आणि केबल त्वरित काढून टाकण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, जैन समाजाचा पर्यूषण पर्व सुरू असल्याने या काळात मांसविक्री किंवा जीवहत्या होऊ नये, अशी विनंती जैन समाज बांधवांनी आमदारांना केली. त्यानुसार आमदार पठाण यांनी दुपारी मनपा सभागृहात स्वच्छता विभागाची तातडीची बैठक घेतली.
Maratha Movement : मराठा आरक्षण आंदोलनाआधी सरकारचा मोठा निर्णय !
या बैठकीत मंदिर परिसरात अतिक्रमण होऊ नये, मांस विक्री टाळावी, तसेच आगामी सण-उत्सवांच्या काळात संपूर्ण शहरात स्वच्छता राखावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. विशेषतः गणेशोत्सव आणि ईद मिलादुन्नबीच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छतेसाठी सर्व विभागांनी तयारीत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपआयुक्त गीता ठाकरे, विभाग प्रमुख आणि स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.








