Sajid Khan Pathan : आमदार पोहोचले बालभारतीच्या कार्यालयात!

MLA visited Balbharati divisional office : समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत लढण्याचा दिला शब्द

Akola महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व संशोधन मंडळ अर्थात बालभारतीच्या कार्याची विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाची भूमिका आहे. बालभारतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी आवश्यकतेनुसार विधानसभेत ठामपणे आवाज उठवण्याची ग्वाही अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी दिली.

पुणे येथील बालभारती विभागाला आमदार पठाण यांनी भेट दिली. ही घटना ऐतिहासिक ठरली कारण प्रथमच एका चिकित्सक लोकप्रतिनिधीने स्वतःहून बालभारती विभागाला भेट देऊन तेथील कामकाज आणि समस्या जाणून घेतल्या. भेटीदरम्यान बालभारतीचे अधिकारी, कार्यशाळेसाठी आलेले शिक्षक, तसेच उर्दू विभागातील प्रख्यात शायर नईम फराज, मोहसीन अमीन, वसीम फरहत, मतीन तालीब, वासिक नवेद यांच्याशी आमदार पठाण यांनी दिलखुलास संवाद साधला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा ठरणाऱ्या समस्या त्यांनी आस्थेने ऐकून घेतल्या आणि त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Bungalow dispute : आलिशान घरे पण बंगला न सोडल्याने मुंडे पुन्हा वादात !

या प्रसंगी किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक किरण शामराव केंद्रे, अधिकारी खान नवेदुलहक, सहाय्यक अधिकारी नासिर अली शेख, यासीन आजमी यांनी आमदार पठाण यांचा पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन सत्कार केला. तसेच एमसीईआरटीचे उर्दू प्रमुख तौसिफ परवेज, अंजुमन इस्लामी मुंबईचे उपाध्यक्ष अब्दुल्ला शेख, लिपिक इंद्रसेन भोवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वासिक नवेद यांनी केले तर आभारप्रदर्शन वसीम फरहत यांनी केले.