व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sajid Khan Pathan : आमदाराच्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट, ५०० रुपयांचा दंड

Sajid Khan Pathan : आमदाराच्या गाडीला फॅन्सी नंबर प्लेट, ५०० रुपयांचा दंड

MLA Sajid Khan Pathan fined ₹500 for a fancy number plate on his vehicle : साजिद खान पठाण यांच्यावर भुसावळमध्ये कारवाई, वाहतूक नियमांचे उल्लंघन

Akola समाजात नियम-कायद्यांचे पालन व्यवस्थित होत आहे की नाही, यावर लक्ष देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींची असते. वेळ आल्यास स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांना कायद्यांचे महत्त्व सांगावे लागते. मात्र लोकप्रनिधीच कायदे आणि नियमांना धाब्यावर बसवत असल्याचे बरेचदा बघायला मिळते. असाच प्रकार अकोल्याचे आमदार साजीद खान पठाण यांच्याबाबतीत घडल्याचे पुढे आले आहे.

काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या चारचाकी वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट आढळून आल्याने भुसावळ येथे त्यांना ५०० रुपयांचा ऑनलाईन दंड करण्यात आला. ही माहिती शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी उमेश महाले यांनी दिली.

Amravati university : ‘ते पन्नास दिवस’ वादात विद्यापीठाचा यू-टर्न; राजकीय दबावामुळे अभ्यासक्रमातून कादंबरी वगळली?

काँग्रेस पक्षाच्या ‘संघटन सुजाण’ अभियानांतर्गत भुसावळ शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी आमदार पठाण शनिवारी शहरात आले होते. कार्यक्रमादरम्यान यावल रस्त्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या वाहनाची वाहतूक शाखेकडून तपासणी करण्यात आली.

Rahul bondre : ‘ताटातले वाटीत आणि वाटीतले ताटात’, भाजप-सेनेवर टीका

या तपासणीत संबंधित वाहनावर फॅन्सी नंबर प्लेट असल्याचे आढळले. हा प्रकार वाहतूक नियमांचे उल्लंघन ठरत असल्याने भुसावळ शहर वाहतूक शाखेकडून संबंधित वाहनावर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.

error: Content is protected !!