Breaking

Salon and Beauty Parlor Association : नट्टा-थट्टा महागणार? दरवाढ होण्याची शक्यता!

 

Beauty parlour, salon rates likely to increase : सलून आणि ब्युटीपार्लर असोसिएशनचा निर्णय

Wardha महिलांचा नट्टा-थट्टा आणि पुरुषांच्या दाढी-कटिंगचे दर आता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसणार आहे. सलून आणि ब्युटीपार्लर असोसिएशनने नवीन वर्षात केशकर्तनालय, ब्युटीपार्लर आणि सलूनचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नववर्षात केसांची कात्री आता ग्राहकांच्या खिशाला लागणार आहे.

संघटनेने ब्युटीपार्लरच्या आणि सलूनच्या सध्याच्या दरात किमान २० ते ३० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, जिल्ह्यात हे नवीन दर अद्याप लागू झालेले नाहीत. जिल्हाभरात असलेल्या सलून आणि ब्युटीपार्लर व्यावसायिकांनी दरात सध्यातरी वाढ केलेली नाहीत. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने आणि इंधनाच्या दरातही वाढ झाल्याने याचा परिणाम व्यावसायिकांवरही झाला असून, त्यांनाही या दरवाढीचा फटका बसत आहे.

Dr. Pankaj Bhoyar : १०२ भुखंडांचा प्रश्न आता राज्यमंत्र्यांच्या कोर्टात!

वाढत्या महागाईने सौंदर्यप्रसाधनांच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे ब्युटीपार्लरमध्ये फेशियलच्या किमतीत वाढ झाली आहे. याचा फटका व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी किंवा हे नुकसान कमी करण्यासाठी दरवाढ करण्याचा विचार करण्यात आला आहे.

स्टायलिश कटिंगसाठी वेगळे दर
आता स्टायलिश कटिंगची चांगलीच डिमांड आहे. गावापासून ते शहरापर्यंतच्या युवकांमध्ये ही क्रेझ चांगलीच वाढली असून, बहुतांश सलून या स्टायलिश कटिंगकरिता ओळखली जातात. त्यामुळे साध्या कटिंगव्यतिरिक्त विविध स्टायलिश कटिंगकरिता वेगवेगळे दर आकारले जात आहेत.

Local body elections: मुदतवाढीची शक्यता मावळली, विद्यमान सदस्य निरोप घेण्याच्या तयारीत

कारागिरांचा पगारही वाढला
सध्या ग्राहकही सलूनचे दुकान पाहून जातात. त्यामुळे ग्राहकांच्या अपेक्षेतील सलूनचे दुकानही आकर्षक बनविण्यात आले आहे. दुकान सुसज्ज करण्यासाठी आणि ते नीटनेटके ठेवण्यासाठी खर्चही वाढला असून, काम करणाऱ्या कारागिरांचा पगारही वाढला आहे. परिणामी, हा खर्च भरून काढण्यासाठी दरवाढ हा पर्याय निवडला आहे.