Sameer Meghe took the Bokhara Gram Panchayat scam to the Legislative Assembly : बोखारा ग्रामपंचायतीचा घोटाळा समीर मेघेंनी नेला विधानसभेत
Mumabai : नागपूर जिल्ह्याच्या हिंगणा तालुक्यातील बोखारा ग्रामपंचायतीमध्ये सन २०२३-२४ या एका वर्षात १६ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप हिंगण्याचे आमदार समीर मेघे यांनी केला. जिल्हा परिषदेच्या तत्कालिन उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या दबावाखाली काही ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केल्याचेही आमदार मेघे यांनी सभागृहाला सांगितले.
यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना आमदार मेघे म्हणाले, २०१५-१६ पासून टॅक्स असेसमेंट सॉफ्टवेअर ग्रामपंचायतीत सुरू करण्यात आले. या माध्यमातून टॅक्स वसुली १ कोटी ७५ लाख दिसते आहे. रेकॉर्ड तपासल्यास फक्त २८ लाख रुपये थकीत दिसतात. तर मग बाकीचा पैसा गेला कुठे, हा प्रश्न पडतो. खोलात जाऊन चौकशी केली असता, काही सदस्यांच्या दबावाखाली कर्मचाऱ्यांनी १४० खोटे बिल बुक छापल्याचे निदर्शनास आले. अधिक खोलात गेलो असता ९ खोटी बिलबुके सापडली. ती पुरावा म्हणून सभागृहात आणली आहेत. ९ खोट्या बिल बुक्समधून ४० लाख रुपयांचा घोटाळा हाती लागला.
Sudhir Mungantiwar : आपल्या मनातील राम-रावणाच्या युद्धात रामच जिंकावा, ही गायत्री परिवाराची शिकवण !
कुंदा राऊत यांचा दबाव..
यासंदर्भात झालेल्या संभाषणाच्या ऑडिओ क्लिप्ससुद्धा आहेत. त्याची फॉरेन्सीक तपासणीही केली आहे. त्याचेही रिपोर्टही आणलेले आहेत, ते सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना देतो. ग्रामपंचायतीच्या हद्दीत १३ मोठमोठी दुकाने आहेत. सदस्यांच्या दबावाखाली १३ दुकानांमधून ४५ लाख रुपये खोटी बिले देऊन काढण्यात आलेले आहेत. ग्रामपंचायतीला निधी मिळतो. त्याचे ऑनलाईन टेंडर करण्यात आले. पण ऑफलाईनही टेंडरही करण्यात आले. २०२३-२४ मध्ये या प्रकाराची तक्रार झाली. तेव्हा सचिवाने बयाण दिले की, जिल्हा परिषदेच्या तत्कालीन उपाध्यक्ष कुंदा राऊत यांच्या दबावाखाली केले. ही बाब अतिशय गंभीर असल्याचे आमदार मेघे म्हणाले.
Sudhir Mungantiwar : स्त्रीच्या सन्मानाची काळजी घेणे, हीच खऱ्या अर्थाने महिला दिनाची सार्थकता !
कपिल कलोडेंनीही टाकला दबाव..
उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे यांनी विस्तार अधिकाऱ्याला आदेश दिले की, कुंदा राऊत यांचे नाव घेऊ नका. प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी दबाव टाकला. त्यामुळे कलोडे यांनाही निलंबीत करण्याची मागणी आमदार मेघेंनी केली. सरपंच आणि सचिवांच्या खोट्या सह्या करून पाणी टॅंकरचीही बिल काढल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात नागपूरच्या कोराडी पोलिस स्टेशमध्ये एफआयर झाली आहे. पण कर्मचाऱ्यांना निलंबित केले तरी तो पैसा वसूल होणार नाही. त्यामुळे इओडब्लूला तपास करण्याचा आदेश देणार का, असा प्रश्न आमदार मेघे यांनी केला. असे घोटाळे राज्यभर किती ग्रामपंचायतींमध्ये चालत असतील. त्याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार मेघे यांनी केली.
इओडब्लूकडे देणार तपास..
या लक्षवेधीला उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले, आमदार मेघेंच्या
प्रत्येक मुद्द्यामध्ये तथ्थ्य आहे. बोखारा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार केला. गेल्या १२-१३ वर्षांपासून हा भ्रष्टाचार सुरू आहे. ५.२.२०२५ ला ग्रामविकास अधिकाऱ्याला पहिले पत्र दिले. गटविकास अधिकारी नागपूर यांनी ७.२.२०२५ ला ग्रामपंचायतीला भेट देऊन चौकशी केली. ३१ लाख ४५ हजार ४८३ रुपयांचा अपहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
Sudhir Mungantiwar : क्रांतीवीर बाबुराव शेडमाके हे पराक्रमाचे प्रतीक !
नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बैठकीतही तक्रारी झाल्या. त्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या. २०.२.२०२५ ला चौकशी समिती स्थापन केली. लेखा व वित्त अधिकाऱ्यांची चौकशी समिती नेमली. या समितीने ११ दिवस चौकशी करून अहवाल दिला, तो गंभीर आहे. सॉफ्टवेअर मॅन्यूपुलेट करून हा भ्रष्टाचार झाला. एफआयआर दाखल करण्यात सीईओंनी दिरंगाई केली. त्या काळात देशमुख ,पोटभरे, नागरगोजे, मनोज घोटे असे चार ग्रामसेवक काम करत होते. त्यांना तात्काळ निलंबीत करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. गजानन चव्हाण या विस्तार अधिकाऱ्याच्याही अनेक तक्रारी आहेत. त्यालाही निलंबित करण्याचे आदेश देतो आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कलोटेंचीही चौकशी केली जाईल. कुणालाही सोडले जाणार नाही आणि इओडब्ल्यूकडे या प्रकरणाचा तपास देण्यात येईल, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.