Shivsena Mahila Aghadi Demands High-Level Inquiry : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, शिवसेना महिला आघाडीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी
Buldhana सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संबोधित निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले की, डॉ. संपदा मुंडे यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक अनिल महाडीक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गंभीर व चिंताजनक असल्याचे आघाडीने म्हटले आहे.
Ajit Pawar : अजितदादांना अप्रत्यक्षपणे टार्गेट केले जात आहे का?
शिवसेनेच्या निवेदनात पुढे आरोप करण्यात आला की, सत्ताधारी पक्षाशी संबंधित माजी खासदार रणजीत नाईक-निंबालकर, त्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र शिंदे व रोहित नागतिळे हे स्थानिक प्रशासनावर प्रभाव टाकून आरोपींना संरक्षण देत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
Investigation of ‘Vasantdada Sugar : शरद पवार अध्यक्ष असलेल्या ‘वसंतदादा शुगर’ची चौकशी !
डॉ. मुंडे यांनी आपल्या सेवाकाळात प्रामाणिकपणे काम करताना काही पोलिसीय दबाव नाकारला होता, त्यामुळेच त्यांच्यावर छळाची तीव्रता वाढल्याचेही निवेदनात म्हटले आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर लिहिलेल्या मजकुरातून पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्याकडून बलात्कार, तसेच प्रशांत बनकर व इतरांकडून मानसिक व शारीरिक छळ झाल्याचे गंभीर आरोप केले होते. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना तत्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.








