Due to lack of drainage, farms adjacent to highway are flooded : दुसरबीड व डोणगाव परिसरातील पिकांचे मोठे नुकसान
Buldhana समृद्धी महामार्गालगतच्या अंडरपासमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे दुसरबीड व डोणगाव परिसरातील शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरून पिकांचे गंभीर नुकसान झाले आहे. निचऱ्याच्या अभावामुळे शेतकऱ्यांची प्रचंड हानी होत आहे. नुकसानभरपाईसह तातडीने कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
मेहकर तालुक्यातील डोणगाव आणि सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड शिवारात समृद्धी महामार्गालगत अंडरपासमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले आहे. त्यामुळे परिसरात चिखलाचे साम्राज्य पसरले असून, रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेषतः शेतांमध्ये जाणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत.
Bachchu Kadu : अंबानीला एवढाच वन्यप्राण्यांचा शौक असेल तर तिकडे डुकरं पाठवतो !
नागपूर कॉरिडॉरमधील चॅनेल क्र. ३१६ जवळील वर्दडी खुर्द शिवारात महामार्गावरून वाहून आलेले पाणी थेट गट क्रमांक २३, २४ आणि २५ मधील शेतांमध्ये घुसल्याने मक्यापासून भाजीपाल्यापर्यंतची पिके पाण्याखाली गेली आहेत. अंजनी परिसरातील अंडरपासमध्ये जेसीबीच्या मदतीने चिखल हटवण्यात आला असला, तरी पावसाळ्यात पुन्हा अशीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेतकरी बाबूराव साहेबराव खंदारे आणि तेजराव आत्माराम हिवाळे यांची पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत.
महामार्गाच्या बांधकामात निचऱ्याचा विचार न केल्यामुळेच ही स्थिती उद्भवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांनी सिंदखेड राजा तहसीलदारांना निवेदन देत तातडीने पंचनामा करण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसानभरपाई आणि भविष्यातील अशा घटनांना आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी निचऱ्याची यंत्रणा उभारावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. “समृद्धी महामार्गामुळे वारंवार आमच्या शेतात पाणी शिरते. यंदा संपूर्ण पीक नष्ट झाले. आम्हाला योग्य नुकसानभरपाई मिळावी.”अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना उरले सुरले कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, म्हणून..!
तत्काळ पंचनामा व नुकसानभरपाई, समृद्धी महामार्गालगत कायमस्वरूपी पाण्याचा निचरा, भविष्यातील हानी टाळण्यासाठी यंत्रणांची उभारणी, आदी मागण्या शेतकऱ्यांनी केल्या आहेत. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा दिला आहे.