Breaking

Samruddhi Mahamarg : प्रयागराजहून मुंबईला परत जाताना अपघात!

 

Accident while returning from Prayagraj to Mumbai : समृद्धीवरील घटना; एक गंभीर पाच किरकोळ जखमी

Wardha प्रयागराज येथील कुंभस्नान करून मुंबईला परत जात असलेल्या ट्रॅव्हल्सचालकाला झोपेची डुलकी लागली. त्यानंतर प्रवासी भरून असलेली ट्रॅव्हल्स ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरील ट्रकवर जाऊन आदळली. यात चालक गंभीर जखमी झाला, तर पाच प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.

हा अपघात मध्यरात्री २:५० वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवरील येळाकेळीनजीक झाला. या अपघाताची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे. नामदेव सखाराम पवार (५५) असे जखमी चालकाचे नाव आहे. तर इतर प्रवाशांची नावे कळू शकली नाहीत.

Accident on Samruddhi Mahamarg : प्रयागराजवरून परतताना अपघात; दोघे ठार

मुंबई येथील प्रवासी प्रयागराज येथील कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी ट्रॅव्हल्सने (क्रमांक एमपी- १३, झेडजे- ३६४४) प्रयागराज येथे गेले होते. परतीच्या प्रवासासाठी समृद्धी महामार्गावरून मुंबई येथे जाताना येळाकेळी येथे चालक नामदेव पवार समोरील ट्रकला ओव्हरटेक करताना त्याला झोपेची डुलकी आली. ट्रॅव्हल्स अनियंत्रित होत थेट समोरील ट्रकला जाऊन धडकली. सुदैवाने ट्रॅव्हल्समधील प्रवासी बचावले. या अपघाताची नोंद सावंगी पोलिसांनी घेतली आहे.

Samruddhi Mahamarg : अपघातानंतर कारने घेतला पेट, दाेन ठार!

अपघात घडताच याची माहिती जाम महामार्ग पोलिसांना मिळाली. पोलिस उपनिरीक्षक दिलीप थाटे, किशोर येळणे, अशोक भोगे, गजनन देवकाते, उद्धव डोमबाडे, मनीष पवार, संतोष मगिडवार हे रुग्णवाहिका आणि क्यूआरव्ही कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी पोहोचले. चालक केबिनमध्ये फसला होता. तर इतर प्रवाशांपैकी पाच प्रवाशांना किरकोळ मार लागला होता.

महामार्ग पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने चालकाला बाहेर काढले. ट्रॅव्हल्सचालक व इतर जखमींना रुग्णवाहिकेतून सावंगी रुग्णालयात पाठवत वाहतूक सुरळीत केली. प्रयागराज येथून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये ३४ प्रवासी होते. यामध्ये लहान मुले देखील होती. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Kalmeshwar accident: कळमेश्वरमधील बारूद कारखान्यात स्फोट

अपघात झाल्यानंतर सावंगी पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक संदीप कापडे कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. त्यांनी प्रवाशांना वाहनातून नेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. तसेच दुसरी ट्रॅव्हल्स बोलावून त्यांना मुंबई येथे रवाना केले.