Breaking

Sand beach : लाभार्थ्यांचे नुकसान करू नका, आमदार मुनगंटीवार यांच्या सूचना

 

Don’t harm the beneficiaries, MLA Sudhir Mungantiwar’s instruction : महसूल मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत करणार झूम बैठकीचे आयोजन

Chandrapur : सरकारने लोकांना घरकुल मंजूर केले. पण बांधकामासाठी रेती उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे घरकुलधारकांमध्ये असंतोष आहे. रेती पुरवठ्याबाबतचा निर्णय लवकर घेणे गरजेचे आहे. पण हे करताना लाभार्थ्यांचे नुकसान होऊ देऊ नका, अशा स्पष्ट सुचना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.

घरकुल योजनेतील लोकांना वेळेत आणि पुरेशी रेती उपलब्ध करून देण्यासाठी नुकतीच चंद्रपूर नियोजन भवन सभागृहात आमदार मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्यांनी उपरोक्त सुचना दिल्या. ते म्हणाले, जिल्ह्यातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्रापुढील यक्ष प्रश्न आहे. हा प्रश्न सोडवण्यासाटी प्रभावी नियोजनाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवार यांच्यामुळे आराध्याच्या कानाला लाभले आनंदाचे सूर

बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार, रवींद्र माने, अजय चरडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी, तहसीलदार विजय पवार, मृदुला मोरे, रेणुका कोकाटे, रेखा वाणी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मुलचे मुख्याधिकारी संदीप दोडे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते तसेच मतदारसंघातील सर्व तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांनी दिली “माझे आरोग्य माझ्या हाती” उपक्रमाला गती

सद्यस्थितीत मुल तालुक्यातील पाच महसूल मंडळांतील रेती घाटांमध्ये ८ हजार ब्रास रेतीसाठा उपलब्ध आहे. तर गरज २५ हजार ब्रास लेतीची आहे. पोंभूर्णा तालुक्यात १९,६०० ब्रास रेतीसाठी आहे. बल्लारपूरमध्ये १८,४६५ ब्रासची मागणी असताना केवळ २६० ब्रास रेती उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व रेती घाट १० जूननंतर बंद होणार आहेत. त्यामुळे या एक महिन्यात योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे आमदार मुनगंटीवार म्हणाले.

Sudhir Mungantiwar Meets Nitin Gadkari : मुनगंटीवारांनी मागणी केली, गडकरींची ‘ऑन दि स्पॉट’ मंजुरी!

गटविकास अधिकाऱ्यांनी मंजूर घरकुलांसाठी रेतीची मागणी तहसीलदारांकडे नोंदवावी. नदी, नाले व घाटांची पाहणी करून शक्य तेवढी रेती तहसीलदारांनी उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही लाभार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत झूम बैठकीचे आयोजन लवकरच करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना वेळेत रेती उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने समन्वय साधून काम करावे, अशा सुचना आमदार मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.