Conduct a thorough investigation into the school ID corruption : आमदार संदीप जोशींची मागणी, शिक्षण संचालकांना पत्र
Nagpur राज्यभरात गाजत असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शालार्थ आयडी भ्रष्टाचाराचा पाेलिस विभागाच्या एसआयटीमार्फत तपास सुरू आहे, मात्र हे प्रकरण गंभीर असून याची सखाेल चाैकशी करण्यासाठी शिक्षण विभाग आणि पाेलिस विभाग यांनी एकत्रितपणे चाैकशी व्हावी, अशी मागणी करणारे पत्र आमदार संदीप जाेशी यांनी शिक्षण संचालकांना लिहिले आहे.
२०१२-१३ संच मान्यता न मिळालेल्या, अल्पसंख्याक व बिगर अल्पसंख्याक शाळांना काल्पनिक संचमान्यता, शाईच्या मान्यता गृहीत धरून मान्यता प्रदान करण्यात आल्या आहेत. शिक्षकेतर कर्मचारी पदभरती बंदी असतानाही अल्पसंख्याक शाळेत नियुक्ती व शालार्थ आयडी प्रदान करण्यात आलेल्या आहेत. शिक्षक-कर्मचारी यांच्या करण्यात आलेल्या नियुक्त्या, त्यास प्रदान करण्यात आलेल्या मान्यता, यात नियुक्तीसाठी देण्यात आलेल्या जाहिराती कोणत्या वृत्तपत्रातून देण्यात आल्या, हेही तपासण्याची आवश्यकता आहे.
Chandrashekhar Bawankule : जनतेच्या कामात दिरंगाई नको, तत्परता बाळगा
नागपूर, चंद्रपूर, भंडारासह नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-कर्मचारी नियुक्ती अनियमितता याची तपासणी करण्यात यावी. सायबर क्राईम नागपूर व शिक्षण संचालनालय यांची शालार्थ आयडी प्रकरणात एकत्र तपासणी आवश्यक आहे, अशी विनंती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर व आयुक्त शिक्षण यांना आ. जोशी यांनी निवेदनातून केली आहे.
Collector of Buldhana : भूमीहक्क, कर्जमुक्ती व सामाजिक न्यायासाठी बहुजनांचा हल्लाबोल!
नागपूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक गेल्या २० दिवसांपासून पुणे येथे शालार्थच्या प्रकरणात तपासणीसाठी गेले आहेत. पुण्यात त्यांच्या उपस्थितीची आवश्यकता आहे काय, असा सवाल आ. जाेशी यांनी केला आहे. शिक्षण उपसंचालक अटकेत, बाेर्ड अध्यक्ष-सचिवही अटकेत आणि दाेन्ही शिक्षणाधिकारी पुण्यात असल्याने शिक्षण विभाग वाऱ्यावर असल्याची टीका त्यांनी केली.