Breaking

Sandip Joshi : शहरातील पाणी प्रश्नाबाबत लोकप्रतिनिधींची बैठक घ्या !

MLA Sandeep Joshi’s Letter to Guardian Minister Chandrashekhar Bawankule : आमदार संदीप जोशी यांचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन

Nagpur : नागपूर शहरातील पाणी प्रश्नाच्या संदर्भात शहरातील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक आयोजित करुन चर्चा करण्यात यावी, अशी मागणी आमदार संदीप जोशी यांनी राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना केली आहे. यासंदर्भात त्यांनी शुक्रवारी (११ एप्रिल) पालकमंत्र्यांना निवेदन दिले.

नागपूर शहरात नागपूर महानगरपालिकेद्वारे ओसीडब्ल्यूमार्फत पाणी पुरवठा केला जातो. मात्र रोजच शहरातील कुठल्या ना कुठल्या भागामध्ये पाणी पुरवठा बाधित असतो. कधी ट्रिपिंगची समस्या तर कधी गळतीमुळे ब्रेकडाउन, कधी देखभाल दुरुस्तीसाठी शटडाउन, अशी कारणे दाखवून रोजच पाणी पुरवठा बाधित केला जातो.

Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्री म्हणाले, कर्जमाफी होणारच; बच्चू कडू म्हणतात मुहूर्त शोधताय का?

या अनियमित पाणी पुरवठ्याचा त्रास शहरातील गोरगरीब सर्वसामान्य जनतेला सोसावा लागतो. त्याचा रोष शहरातील लोकप्रतिनिधींवर व्यक्त केला जातो. ऐन उन्हाळ्यात निर्माण झालेल्या या स्थितीकडे लक्ष देऊन प्रशासनाला निर्देश देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींची मनपा प्रशासन आणि ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्याची मागणी आमदार संदीप जोशी यांनी केली आहे.

Lord Shri Ram : अकोल्यातून ८३४ जेष्ठ नागरिकांची विशेष तीर्थ रेल्वे !

नागपूर शहरासह जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटला आहे. ही समस्या दरवर्षीचीच आहे. पाणी टंचाईची तयारी उन्हाळा सुरू होण्याच्या तीन महीने सुरू केली. तर ही स्थिती उद्भवणार नाही. पण दरवर्षी हेच चित्र बघणाऱ्या प्रशासनाच्या ही बाब लक्षात का येत नाही, हा प्रश्न आहे. आमदार संदीप जोशी यांनी बैठक घेण्याची मागणी केली. यानंतर बैठकीचा मुहूर्त निघेल. त्यात आणखी काही दिवस जातील. कदाचित उपाययोजना कागदावरून प्रत्यक्षात येण्याकरिता पुढचा महिना उजाडेल. तोपर्यंत जनता होरपळत राहील. अशी स्थिती येऊ नये, यासाठी प्रशासनाने आधीच पूर्वतयारी करावी, अशी मागणी आहे.