Breaking

Sandip Kshirsagar : ही तर कमालच झाली; सत्ताधारीच करू लागलेत आंदोलन!

Ruling party’s protest against opposition MLA : विरोधी पक्षातील आमदारावर आरोप; तोडपाणीसाठी क्षीरसागरांनी कामे रोखल्याचा आरोप

Beed एकीकडे राज्यभर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधीपक्षातील नेते आंदोलन करीत आहेत. तर दुसरीकडे बीडमध्ये सत्ताधारीच आंदोलन करू लागले आहेत. विरोधीपक्षातील आमदार संदीप क्षीरसागर यांनी तोडपाणीसाठी विकासकामे रोखल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे NCP Sharad Pawar आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात स्थानिक पदाधिकाही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. या घटनेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

मतदारसंघात 2019 पासून हीच परिस्थिती असून कोट्यवधी रुपयांची टक्केवारी घेऊन आमदार क्षीरसागर कामे अडवत असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे. केवळ तोडपाणी करण्यासाठी कामे अडविण्याचे काम आमदार करत आहेत. पालकमंत्री अजित पवार DCm Ajit Pawar यांच्या निदर्शनास ही बाब आणून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं आंदोलकांनी म्हटलं आहे.

Raja Raghuvanshi murder case : ‘सोनम’ बेवफा! ‘राजा’सोबत हनिमूनला गेली; जीव अडकला नोकरामध्ये!

जिल्हा परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागातील जनतेची कामे अडविण्यात आली आहेत. केवळ आमदारच नाही तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी देखील मतदार संघातील कामे रोखले असल्याचे आंदोलक सांगत आहेत. तसेच क्षीरसागर यांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

Monsoon delayed : पाऊस आला, पण मान्सून लांबणीवर!

आंदोलनात सहभागी झालेले स्थानिक पदाधिकारी हे सत्ताधारी पक्षाचे असून महायुतीमधील तिन्ही पक्षाचे आहेत. त्यामुळे, विरोधी पक्षातील आमदाराविरुद्ध ही स्थानिक नेतेमंडळी एकत्र येऊन संताप व्यक्त करत आहे. जिल्हा परिषद, पीडब्लूडी विभागाची कामे अडवली आहेत. कार्यकारी अभियंता, उप कार्यकारी अभियंता आणि ज्युनिअर इंजिनिअर हे तिन्ही अधिकारी आ. क्षीरसागर यांनी घरगडी म्हणून ठेवले आहेत. असा गंभीर आरोपही कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

या अधिकाऱ्यांना मंत्र्यांचे फोन गेले, पालकमंत्र्यांचे फोन गेले तरीही अधिकारी काम ऐकत नाहीत, असा आरोपही आंदोलकांनी केला आहे. विशेष म्हणजे, या आंदोलनात महायुतीमधील तिन्ही पक्षातील स्थानिक कार्यकर्त्यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला.